दोस्ती यारी मध्ये पैजा तर खूप लागतात परंतु सर्वच पैजा गांभीर्याने घेतल्या जात नाहीत. परंतु दारू पिऊन आलेल्या तिघांनी त्याच अवस्थेत पैज लावली. ही पैज त्यांना खूपच महागात पडली. तीन मित्रांनी दारूचे अनेक पेग रीचवल्यानंतर अशी पैज लावली की त्यांच्या पैजेबद्दल बातम्या छापून आल्या.
एक विचित्र अट पुरी करण्यासाठी या तिन्ही मित्रांनी दुर्गम पहाडी भागामध्ये 258 मैल म्हणजे सुमारे चारशे पंधरा किलोमीटर पळण्याचा त्रास सहन केला. ब्रिटनमधील मिरर युके या दैनिकाच्या वृत्तानुसार जोडी ब्रेकर, जोडी गोल्ड आणि गाईबे या तिघांनी एका पार्टीमध्ये लावली जोडी आणि त्यांनी निश्चित केले की पृथ्वीचा नकाशाचा गोल गोलाकार फिरवत ज्या ठिकाणी बोट ठेवले जाईल तेथे पर्यंत पळावे लागेल. जेव्हा फिरणाऱ्या पृथ्वीच्या नकाशावर त्यांनी बोट ठेवले तर ते ताजिकिस्तान येथे होते हा भाग अफगाणिस्तानची सीमा आणि चीन लगतच्या घाटीमध्ये होता. जगातील हा एक दुर्गम पहाडी भाग म्हणून ओळखला जातो. जोडी ब्रेजरने मिरर ला सांगितले की, पलण्याच्या बाबतीत माझा सराव खूप चांगला आहे. पैज लावली तेव्हा ताजिकिस्तान बाबत काहीही माहिती नव्हती पाहिजे चे पूर्ण करण्याचा निश्चय केला आणि आम्ही धावण्याचे ठरवले. या प्रवासात आम्ही आजारपण, शरीरावर झालेल्या जखमा, निसर्गातील अडथळे, प्रचंड उकाडा आणि व्हिसा अशा अनेक संकटांचा सामना करत जगाचे छत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पामीरच्या पठारावर ही पैज पूर्ण केली. हे तीन मित्र सलग सात दिवस धावत होते. दररोज त्यांनी एका मॅराथॉनपेक्षा अधिक अंतर पार केले. या तीन मित्रांच्या या अजब रेश्मा वर सोळशी फिल्मसने डॉक्युमेंटरी केली आहे.