मध्यवर्ती ठिकाण, माफक तिकीट दर, वेगवेगळे सहसी खेळ, रेस्टॉरंट ची सोय, आकर्षक विद्युत रोषणाई, सोबत संगीताची मेजवानी यामुळे सोलापुरातील सिद्धेश्वर तलावा नजीक पासपोर्ट कार्यालयाजवळ सुरू असलेल्या एडवेंचर पार्कला तोबा गर्दी दिसून येत आहे. उद्यानाची वेळ ही सोमवार ते शुक्रवार दुपारी तीन ते रात्री दहा व शनिवार रविवारी दुपारी एक ते रात्री दहा अशी ठेवण्यात आली आहे. प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती रुपये 20 असून आतील गेम्स आणि रेस्टॉरंट यांचे वेगळे चार्जेस द्यावे लागणार आहेत. स्मार्ट सिटी योजनेतून सुरू करण्यात आलेल्या एडवेंचर पार्कचा सोलापूरकर मनमोराचा आनंद घेत असल्याचे दिसून येते.






