• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आठ महिने, २३ जिल्हे अन् १० हजार किलोमीटरचा थक्क करणारा सायकल प्रवास

Yes News Marathi by Yes News Marathi
July 18, 2021
in मुख्य बातमी
0
आठ महिने, २३ जिल्हे अन् १० हजार किलोमीटरचा थक्क करणारा सायकल प्रवास
0
SHARES
0
VIEWS

 बारामती दि. १७ : पर्यावरण संवर्धन, जलसाक्षरता, महिला सशक्तीकरणा विषयीच्या जनजागृतीसह राज्यातील स्थानिक पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी गेल्या आठ महिन्यापासून सायकलवरुन घराबाहेर पडलेल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या प्रणाली चिकटे या विदर्भकन्येच्या सायकलचे चाक काही क्षणासाठी आज बारामतीत विसावले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी गेल्या आठ महिन्यापासून २३ जिल्ह्यातून दहा हजार किलोमीटरचा सायकलवरुन प्रवास करणाऱ्या या ध्येयवेड्या जलदूत विदर्भकन्येच्या उपक्रमाची सविस्तर माहिती जाणून घेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. मात्र कोरोना काळात सर्व खबरदाऱ्या घेत सुरक्षित प्रवास करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रणालीला यावेळी आवर्जुन दिल्या.

             यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातल्या पुनवट सारख्या छोट्या गावातील प्रणाली विठ्ठल चिकटे या २१ वर्षीय तरुणीने गेल्यावर्षी पुणे येथील ‘यशदा’च्या जलसाक्षरता विभागांतर्गत जलदूत म्हणून प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणानंतर पर्यावरण संवर्धन, जलसाक्षरता, महिला सशक्तीकरण या विषयावर राज्यभर जनजागृती करण्याचा विचार तिच्या मनात आला. नुसता विचार करुन ती थांबली नाही तर प्रणालीने आठ महिन्यापूर्वी तिच्या पुनवट गावातून सायकलवरुन प्रवासाला सुरुवात केली. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रणालीचा हा ध्येयवेडा प्रवास कोणत्याही शासकीय अथवा खासगी संस्थेमार्फत नसून तो वैयक्तिकरित्या सुरु आहे. या उपक्रमासाठी तिने कोणाचीही मदत घेतली नसून तो स्वजबाबदारीवर सुरु आहे.

           गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील २३ जिल्ह्यातून १० हजार किलोमीटरचा प्रवास करत वाटेत लागणाऱ्या स्थानिक  लोकसंस्कृतीचा, पर्यावरणाचा अभ्यास करत प्रणाली आज (दि. १७ जुलै) बारामतीमध्ये आली. ‘यशदा’च्या जलसाक्षर केंद्राचे माजी कार्यकारी संचालक सुमंत पांडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनिलकुमार मुसळे यांच्याशी संपर्क साधून जलदूत प्रणालीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेट घालून दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रणालीच्या सर्व प्रवासाची आणि तिच्या उपक्रमाची अस्थेवाईकपणे चौकशी केली. तिच्या या ध्येयवेड्या उपक्रमाबद्दल तिच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. उपक्रमातील सायकल प्रवासाच्या अखेरच्या टप्याांवर असणाऱ्या प्रणालीला उर्वरीत प्रवासात कोरोना प्रतिबंधाच्या सर्व खबरदाऱ्या घेण्याच्या सूचना देत, तिच्या उपक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्र्यांच्या कौतुकाने विदर्भकन्या भारावली…

          राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपुलकीने केलेल्या चौकशीने भारावून गेलेल्या प्रणालीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. आपल्या उपक्रमाविषयी माहिती देताना प्रणाली म्हणाली, वायू आणि ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी शक्यतो सायकलचा वापर करुया, प्लास्टिकचा वापर टाळूया, लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद करूया जल व मृदसंधारणाची कामे करुया. प्रत्येकाने शक्य तितकी झाडे लावूया आणि आपला परिसर स्वच्छ ठेऊया. बारामती शहरासह तालुक्यातील पर्यावरण संवर्धन आणि जलसंवर्धनाच्या कामाचा आदर्श सर्वांनी घ्यावा,असे आवाहन तिने केले.

Previous Post

ज्येष्ठ साहित्यिक अनंत मनोहर यांचे पुण्यात निधन

Next Post

कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

Related Posts

विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले
मुख्य बातमी

विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

October 16, 2026
केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!
मुख्य बातमी

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

October 16, 2026
राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुख्य बातमी

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
Next Post
कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

ताज्या बातम्या

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

October 16, 2026
केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

October 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026