बनावट पिस्टल चा तपास करताना 22 गुन्ह्यातील सराईत शिकारी जाळ्यात
सोलापूर – देशी बनावटीचे गावठी पिस्टल जवळ बाळगणाऱ्या लक्ष्मण चानांप्पा उर्फ चंद्राम पुजारी ( चिंचोली अक्कलकोट ) याला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. क्रिस्टल विकणाऱ्या सिद्ध्या झिझिग्या पवार (कलकर्जाळ दक्षिण सोलापूर) यालाही जर बंद केलं त्याच्या घराची झडती घेतल्यावर त्या ठिकाणी पाच हरीण व काळवीटाची दहा शिंगे व शिकारीचे चार जाळे सापडले. तो तब्बल 22 पुण्यामध्ये पोलिसांना हवा होता हेही तपासात निष्पन्न झाले.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मंद्रूप हद्दीत गस्त घालताना सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजावर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली चिंचोली येथील एक व्यक्ती गावठी पिस्टल घेऊन फिरत असल्याचे समजले टाकळी येथील चौकात पोलीस उपनिरीक्षक सुरज निंबाळकर यांच्या पथकाने गनिमी कावा करून चंद्रम पुजारीला पकडले त्याच्याकडे पिस्टल सोबत दोन जिवंत काढतूस सापडले. त्याच्या विरुद्ध मंद्रूप पोलिसात गुन्हा दाखल झाला त्याने कलकर्जाळ येथील सिद्ध्या पवार यांच्याकडून ती पिस्टल विकत घेतल्याची माहिती तपासात समोर आली पोलिसांनी सिद्ध्या पवारलाही सापळा रचून 13 मैल चौकात पकडले तपास करताना त्याच्याविरुद्ध अक्कलकोट सोलापूर व मंगळवेढा या उपविभागात 22 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले या गुन्ह्यातील तो पाहिजे आरोपी होता.
पोलिसांनी चोरीतील दागिन्यासह एकूण पाच लाख 17 हजार 659 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज निंबाळकर रविराज कांबळे राजू डांगे राजेश गायकवाड सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजावर श्रीकांत गायकवाड पोलीस हवालदार परशुराम शिंदे धनाजी गाडे सलीम भगवान विजयकुमार भरले रवी माने अन्वर अत्तार समर्थ गाजरे विनायक घोरपडे यश देवकते समीर शेख सतीश कापरे यांच्या पथकाने पार पाडली.