सोलापूर (मंद्रूप) – शेतीच्या उताऱ्यावरून एमआयडीसीसाठी आरक्षित क्षेत्र म्हणून केलेली नोंद कमी करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या पाच महिन्यापासून मंद्रूपचे शेतकरी धरणे आंदोलन करत होते. परंतु गेली पाच महिन्यात आश्वासनाशिवाय कोणतीही कृती झाली नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मंद्रूपहुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर बैलगाडी मोर्चा काढला आहे.
मंत्र्यांची फक्त आश्वासने या मागणीसाठी आजपर्यंत उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्यासह प्रशासनातील उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सहसचिव संजय देगावकर, उद्योग विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या भेटी घेऊन नोंद कमी करण्याची विनंती केली पण उताऱ्यावरील नोंद कमी करण्यात आल्या नाहीत. यामुळे शेवटी वैतागून शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढण्याचा निर्धार केला आप सायंकाळी हे शेतकरी मंद्रूपहून मुंबईसाठी रवाना झाले आहेत.