येस न्युज मराठी नेटवर्क : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित मदत देण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून ‘११२’ हेल्पलाइन क्रमांक लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) प्रणालीवर आधारित ही सेवा असेल. नवा क्रमांक सुरू झाल्यानंतर यापूर्वीचा ‘१००’ हा क्रमांक बंद करण्यात येणार आहे.
एखाद्या नागरिकाने ‘११२’ क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर तो दूरध्वनी मुंबई किंवा नागपूर येथील कॉल सेंटरमध्ये जाईल. तेथील प्रतिनिधी तक्रारदाराबरोबर संवाद साधतील. ही बहुभाषिक सेवा असल्यामुळे तक्रारदाराला भाषिक अडचण येणार नाही, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी दिली.