सोलापुर : सिद्धेश्वर सोशल फाऊंडेशन चॅम्पियन ट्रॉफी 2021 चे उदघाटन मनपाचे उपआयुक्त धनराज पांडे यांच्या हस्ते संपन्न झाला
यावेळी इंडियन मॉडेल स्कूलचे सचिव अमोल जोशी ,मनोरमा बँकेचे माजी चेअरमन संतोष सुरवसे, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोशियन निवड समिती चेअरमन उदय डोके,उद्योगपती समीर लोंढे ,कॉन्ट्रॅक्टर सतीश सुरवसे, नामवंत खेळाडू किशोर बोरामणी संस्थेचे अध्यक्ष आनंद मुस्तारे कार्यअध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, उपाध्यक्ष रेवणसिद्ध बीज्जरगी ,विकास कस्तुरे प्रसिद्धीप्रमुख विशाल कल्याणी सदस्य आशिष बसवंती आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना पांडे म्हणाले की मैदानी खेळातून मुलांच्या शारीरिक विकास होत असतो अलीकडे मुलांचा कल मैदानातील खेळाकडे नसून प्रत्येक जण हा मोबाईल मध्ये गुंतलेला असतो तसेच शहरातील सामाजिक राजकीय संस्थे ने देखील पुढाकार घेऊन चांगल्या दर्जेचे ग्राउंड तयार केले पाहिजेत ipl मूळे अनेक चांगले खेळाडू तयार झाले आहेत असेच चांगले स्पर्धक सोलापुरातून घडतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
सिध्देश्वर महायात्रे निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी श्री. सिध्देश्वर चॉम्पियन ट्रॉफी- 2021 चे आयोजन दि. 18 ते 25 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे ही स्पर्धा आयपीएल धर्तीवर होणार असून, यासाठी सोलापूरातील नामवंत 06 संघात 14 वर्षाखालील मुलांची ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी विजेते संघास व उपविजेते संघास सिध्देश्वर चॉम्पियन ट्रॉफी व आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. व दररोज होणार्या स्पर्धेत (मॅन ऑफ दी मॅच) मध्ये खेळाडूंना ट्रॉफी देण्यात येणार आहे. व (मॅन ऑफ दी सिरिज) खेळाडूला ट्रॉफी आणि आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहे. या स्पर्धेचा बक्षिस वितरण 25 जानेवारी रोजी होणार आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश येमुल,दत्ता बडगु,प्रसाद सावनतुल आदी परिश्रम घेत आहेत.