पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या’ मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने’चा संविधान दिनानिमित्त गुरुवार दिनांक 26 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ होत आहे.ग्रामीण भागातील युवक ,युवती आणि शेतकऱ्यांना पशुधन व व्यवसायातून आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी आज सायंकाळी चार वाजल्यापासून महाडीबीटी 2.0 पोर्टरवर ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होत आहे.
या योजनेत गाय ,म्हैस पालन,शेळीपालन आणि कुक्कुटपालन यांसारख्या व्यवसायांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. तसेच पशुधन व्यवसायासाठी आवश्यक शेड, चारा यांसारखे पर्याय या अर्जामध्ये उपलब्ध आहेत. अर्ज करण्यापूर्वी इच्छुकांनी फार्मर आयडी व महाआयडी तयार ठेवणे आवश्यक आहे .प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार लाभार्थ्यांची निवड होणार आहे. अशी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली माहिती.
प्रमुख अनुदान तपशील –
- दुग्धव्यवसाय घटक (उदा. ५ गायी): सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५०% आणि अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) प्रवर्गासाठी ७५% पर्यंत अनुदान मिळते.
- गोठा बांधकाम: २ ते ६ जनावरांच्या गोठ्यासाठी सुमारे ₹७७,१८८ अनुदान दिले जाते, तर ६ ते १२ जनावरांच्या गोठ्यासाठी त्याहून दुप्पट अनुदान मिळते.
- नर पारडू/रेडकू संगोपन: खाद्य, औषधे व देखभालीसाठी प्रति नर पारडू/रेडकू ₹६,००० अनुदान दिले जाते.
- इतर घटक: शेळी/मेंढी गट (उदा. ५०+५ शेळ्या), कुक्कुटपालन (उदा. ५,००० पक्षी), वैरण विकास/कडबाकुट्टी आणि पशुप्रजनन घटकांसाठी नियमांनुसार अनुदान उपलब्ध आहे.
योजनेचे मुख्य फायदे
- उद्योजकतेला चालना: पशुपालकांना केवळ उत्पादक न ठेवता सक्षम उद्योजक बनवणे आणि ग्रामीण रोजगार वाढवणे.
- थेट लाभ हस्तांतरण (DBT): पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा होते.
- आरक्षण व सवलती: महिलांसाठी ३०% आणि दिव्यांगांसाठी ५% आरक्षण तसेच पात्र कर्जावर व्याज सवलतीसारख्या सुविधा दिल्या जातात.
- आधुनिक सुविधा: चारा/वैरण उत्पादन, गोठा आणि प्रजनन सुधारणेमुळे दूध व मांस उत्पादनात वाढ होते.










