• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज्यातील प्रदूषण कमी करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्त्वाची– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Yes News Marathi by Yes News Marathi
November 20, 2026
in Blog
0
राज्यातील प्रदूषण कमी करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्त्वाची– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
0
SHARES
2
VIEWS

भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पर्यावरण संवर्धनात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा; पर्यावरणपूरक विकासासाठी शासन कटिबद्ध

प्रत्येक वारी प्रदूषणमुक्त, निर्मल व स्वच्छ करण्याचा संकल्प करूया

दर्शन रांगेच्या कामासाठी अतिरिक्त 25 कोटीचा निधी मंजूर

पंढरपूर, दि. २० : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ राज्यभर प्रदूषण नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण काम करत असून, प्रदूषण कमी करण्यासाठी मंडळाची भूमिका मोलाची आहे. सर्वसामान्य नागरिक आणि भाविक वारकऱ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी मंडळाच्या वतीने अनेक वर्षांपासून ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आयोजित ‘कार्तिकीची वारी, पंढरीच्या दारी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आमदार अभिजीत पाटील, आमदार राजू खरे, नगराध्यक्षा प्रणिती भालके, मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार, माजी आमदार शहाजी पाटील, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्याम कुंभार, कार्यकारी अभियंता अमित निमकर, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून पर्यावरण जागृतीचा संदेश गावोगावी पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती, प्लास्टिक बंदीसारखे निर्णय आणि प्रदूषण करणाऱ्या घटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भावी पिढ्यांचे उज्ज्वल भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण केल्यास पर्यावरणपूरक समाज घडण्यास मदत होईल. वृक्षलागवड मोठ्या प्रमाणात करण्यासाठीही सर्वांनी पुढाकार घ्यावा.

आपल्या संतांनी अभंग आणि विचारांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, निसर्गचक्र आणि जलसंवर्धनाचे महत्त्व समाजाला पटवून दिले आहे. त्याच धर्तीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून गोंधळ, पोवाडे आदी लोककलेद्वारे जनजागृती केली जात आहे. राज्यातील 310 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर झाली असून, पर्यावरणाचे योग्य संवर्धन केल्यास निसर्गचक्र टिकून राहील आणि मानवाचे भविष्य उज्ज्वल होईल, असेही त्यांनी सांगितले.

  आषाढी व कार्तिकी वारीदरम्यान पंढरपूर येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या भाविकांना शौचालये, स्वच्छता, पिण्याचे पाणी तसेच दर्शन रांगेतील आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे. प्रत्येक वारी पर्यावरणपूरक, निर्मल व स्वच्छ असावी, वारकऱ्यांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात आणि ते समाधानी होऊन परतावेत, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रदूषण नियंत्रणाच्या कामात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत असून, तरुण पिढीचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी मंडळ प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून राज्यातील दीड लाखांहून अधिक उद्योगांच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी काम केले जात असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सांगितले. राज्याला सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे असून, प्रदूषण नियंत्रणाच्या कार्यात सर्वांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी आवाहन केले.

   मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार यांनी राज्यभर प्रदूषण नियंत्रणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. प्लास्टिकचा वापर टाळून निसर्गाशी नाते अधिक घट्ट करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले.

  ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत शाहीर प्रशांत जाधव, श्रीकांत रेणके, अनिल केदार, शैलाताई खांडगे आणि संजय कानडे यांनी लोककलेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे संदेश दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे यांनी केले.

जिल्हाधिकारी व प्रशासनाच्या कामाचे कौतुक

  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १९ नोव्हेंबर रोजी कार्तिकी वारीच्या अनुषंगाने पंढरपूर शहरात भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी रस्ते दुरुस्ती, ६५ एकर परिसरात वारकऱ्यांसाठी कार्पेट व्यवस्था आणि अन्य सुविधांबाबत सूचना केल्या होत्या. 

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि प्रशासनाने या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करून दुसऱ्याच दिवशी सुविधा उपलब्ध केल्याबद्दल त्यांनी प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले. तसेच दर्शन रांगेच्या कामासाठी व सुविधा निर्माण करण्यासाठी कमी पडत असलेल्या अतिरिक्त 25 कोटी निधीलाही मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कार्तिकी वारीसाठी आलेल्या सर्व वारकरी आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
    यावेळी उपमुख्यमंत्री आणि उपस्थितांनी टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा-तुकोबा’चा जयघोष करत पावली केली.
  
Previous Post

दुष्काळात शेतकऱ्यांचा ऊस शेतातच वाळण्याची भीती; लवकर गाळप होणे गरजेचे

Next Post

प्रिसिजन गप्पांना आल्हाददायक वातावरणात उत्साहात प्रारंभ : प्रकट मुलाखतीतून उलगडला उत्तुंग समाजकार्याचा पट

Related Posts

प्रिसिजन गप्पांना आल्हाददायक वातावरणात उत्साहात प्रारंभ : प्रकट मुलाखतीतून उलगडला उत्तुंग समाजकार्याचा पट
Blog

आंबे येथील विहीर दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांचे खासदार प्रणिती शिंदे यांनी केले सांत्वन
Blog

आंबे येथील विहीर दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांचे खासदार प्रणिती शिंदे यांनी केले सांत्वन

November 18, 2026
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी ; एका तासात कोकणात पोहोचणार ; जाणून घ्या अधिक माहिती …
Blog

कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी ; एका तासात कोकणात पोहोचणार ; जाणून घ्या अधिक माहिती …

November 16, 2026
आंबे विहीर दुर्घटनेतील मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत
Blog

आंबे विहीर दुर्घटनेतील मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत

November 16, 2026
पंढरपूरच्या कॉरिडोर संदर्भात ही महत्त्वाची अपडेट…!
Blog

पंढरपूरच्या कॉरिडोर संदर्भात ही महत्त्वाची अपडेट…!

November 14, 2026
Next Post
प्रिसिजन गप्पांना आल्हाददायक वातावरणात उत्साहात प्रारंभ : प्रकट मुलाखतीतून उलगडला उत्तुंग समाजकार्याचा पट

प्रिसिजन गप्पांना आल्हाददायक वातावरणात उत्साहात प्रारंभ : प्रकट मुलाखतीतून उलगडला उत्तुंग समाजकार्याचा पट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रिसिजन गप्पांना आल्हाददायक वातावरणात उत्साहात प्रारंभ : प्रकट मुलाखतीतून उलगडला उत्तुंग समाजकार्याचा पट

प्रिसिजन गप्पांना आल्हाददायक वातावरणात उत्साहात प्रारंभ : प्रकट मुलाखतीतून उलगडला उत्तुंग समाजकार्याचा पट

November 20, 2026
राज्यातील प्रदूषण कमी करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्त्वाची– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील प्रदूषण कमी करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्त्वाची– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 20, 2026
दुष्काळात शेतकऱ्यांचा ऊस शेतातच वाळण्याची भीती; लवकर गाळप होणे गरजेचे

दुष्काळात शेतकऱ्यांचा ऊस शेतातच वाळण्याची भीती; लवकर गाळप होणे गरजेचे

November 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026