• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महानगरपालिकेच्या अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाची ऐतिहासिक कामगिरी; एकाच दिवसात ५ यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रिया

Yes News Marathi by Yes News Marathi
November 13, 2026
in मुख्य बातमी
0
सोलापूर महानगरपालिकेच्या अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाची ऐतिहासिक कामगिरी; एकाच दिवसात ५ यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रिया
0
SHARES
0
VIEWS

डफरीन रुग्णालयात आरोग्य विभागाचे मोठे यश; मागील दीड महिन्यात तब्बल २०० प्रसूती

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाने वैद्यकीय सेवेत आज एक नवा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. शहरातील डफरीन (शासकीय) रुग्णालयावरील रुग्णांचा वाढता ताण लक्षात घेता, मनपा प्रसूतीगृहाने अत्यंत तत्परतेने पाऊल उचलत आज एकाच दिवसात सकाळी एक आणि रात्री आणीबाणीच्या (Emergency) परिस्थितीत चार, अशा एकूण ५ यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांच्या कुशल आणि गतिमान मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली. या सर्व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. लक्ष्मी बल्ली, भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. सतीश जोशी आणि नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. चाफळकर यांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली.

आरोग्य कर्मचाऱ्यांचे अहोरात्र परिश्रम:
या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहातील मेट्रन लेकुरवाळे, सीनियर सिस्टर ढगे, यासीन बागवान,दर्शन परब चलवादी, घोडके, व्यवहारे तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी , तारा मावशी आणि लक्ष्मी मावशी सुनीता मावशी शबना यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.

प्रसूतीगृहाचा वाढता आलेख:
सध्या डफरीन रुग्णालयातील कामाचा प्रचंड ताण आणि तेथील परिस्थिती पाहता, मनपाच्या अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाने सर्वसामान्य व गरीब रुग्णांना मोठा आधार दिला आहे. या प्रसूतीगृहात मागील महिन्यात १५० प्रसूती यशस्वी झाल्या होत्या, तर चालू महिन्यात आतापर्यंत ५० प्रसूती पूर्ण झाल्या आहेत. अल्पावधीतच एकूण २०० प्रसूती आणि एकाच दिवशी ५ सिझेरियन शस्त्रक्रिया करून मनपा आरोग्य विभागाने आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.

सद्यस्थितीत डफरीन रुग्णालयात कामकाजाचा मोठा ताण असल्याने, गर्भवती मातांनी आणि नातेवाईकांनी कोणत्याही अडचणीशिवाय व तत्पर वैद्यकीय सेवेसाठी सोलापूर महानगरपालिकेच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहातील सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

Previous Post

कामगार संहितांबाबत जनजागृतीसाठी 18 नोव्हेंबर रोजी सोलापुरात ‘श्रम संवाद’

Next Post

गोकुळ दूधही महागणार? दरवाढीचे संकेत; शनिवारी अंतिम निर्णयाची शक्यता

Related Posts

सुजय विखेंचे अध्यक्षपद धोक्यात ?
मुख्य बातमी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन
मुख्य बातमी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

November 13, 2026
टँकर खरेदी, रेबीज लस खरेदी, शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव मनपा बोर्डात… शुक्रवारी सभा
मुख्य बातमी

टँकर खरेदी, रेबीज लस खरेदी, शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव मनपा बोर्डात… शुक्रवारी सभा

November 13, 2026
राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणां विरुद्ध उत्तर सोलापुरात ‘काळी दिवाळी’…
मुख्य बातमी

राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणां विरुद्ध उत्तर सोलापुरात ‘काळी दिवाळी’…

November 13, 2026
Next Post
गोकुळ दूधही महागणार? दरवाढीचे संकेत; शनिवारी अंतिम निर्णयाची शक्यता

गोकुळ दूधही महागणार? दरवाढीचे संकेत; शनिवारी अंतिम निर्णयाची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुजय विखेंचे अध्यक्षपद धोक्यात ?

सुजय विखेंचे अध्यक्षपद धोक्यात ?

November 13, 2026
गोकुळ दूधही महागणार? दरवाढीचे संकेत; शनिवारी अंतिम निर्णयाची शक्यता

गोकुळ दूधही महागणार? दरवाढीचे संकेत; शनिवारी अंतिम निर्णयाची शक्यता

November 13, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाची ऐतिहासिक कामगिरी; एकाच दिवसात ५ यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रिया

सोलापूर महानगरपालिकेच्या अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाची ऐतिहासिक कामगिरी; एकाच दिवसात ५ यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रिया

November 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026