०६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तेलंगवाडी गावाच्या हद्दीत मुंबई वरून तुळजापूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या इर्टिगा कार क्रमांक MH 04 KL 5222 ने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका कंटेनर क्रमांक NL 01 AL 1379 ला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात इर्टिगा कारमधील पाच जणांना डोक्याला , छातीला, हाताला, पायाला जबर मार लागून गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी तीन जणांचा जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला असून हा अपघात एवढा भीषण होता की इर्टिगा कारच्या एका भागाचा चक्काचूर झाला असून या कारमधून प्रवास करणारे सगळे इर्टिगाकारमधेच अडकले होते वरवडे टोल नाका येथील क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त कारचे दरवाजे तोडून जखमींना आणि जागीच मृत्यू झालेल्या व्यक्तींना कारमधून बाहेर काढण्यात आले असून या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या एका पुरुषाला आणि एका महिलेला वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉ गोरखनाथ लोंढे आणि रुग्णवाहिका चालक मगंध भोसले यांनी तर या अपघातामध्ये जागीच मृत्यू झालेल्या दोन व्यक्तींना १०८ शासकीय रुग्णवाहिकेमधून आणि मोहोळ येथील भुंगा फाईट या खासगी रुग्णवाहिकेमधून एका व्यक्तीला मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी त दाखल करण्यात आले असून सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील ग्रस्थीपथक प्रमुख संतोष खडके, चालक तुळशीराम गायकवाड,सहाय्यक विनोद भोसले, आणि मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक पाटील साहेब (PI), मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी मनिषा नारायणकर मॅडम (API) , उमेश पवार (PSI) , हंचे (HC) , मुळे (HC) , आत्तार(HC) , माने (PN) , गवळी (PC) शेंडगे (PN) पवार (PC) सरडे (PC) हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, अपघातग्रस्त इर्टिगा कार ही रस्त्याच्या मधोमध उभी होती त्यामुळे सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या लेनमध्ये वाहतूक कोंडी झाली होती वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथकाने वरवडे टोल नाका येथील क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली असून या अपघातामध्ये जागीच मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे १) विलास भारंबे वय ६६ वर्षे २) शोभा विलास भारंबे वय ६३ वर्षे ३) पार्थ तुषार भारंबे वय ०८ वर्षे तर या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीची नावे खालील प्रमाणे १) तुषार विलास भारंबे वय ४० वर्षे २) पूनम तुषार भारंबे वय ३८ वर्ष सर्वजण रा कल्याण, मुंबई येथील रहिवासी असून या अपघाताचा पुढील तपास मोहोळ पोलिस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी हे करत असून या अपघाताची माहिती मिळताच सोलापूरचे एडिशनल एस पी विजय कबाडे सर यांनी घटनास्थळी भेट दिली असल्याची माहिती वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथकाचे प्रमुख संतोष खडके यांनी दिली आहे.












