उच्च शिक्षण संचालक कार्यालयावर धरणे आंदोलन – सोलापूर जिल्ह्यातून मोठा सहभाग
पुणे – अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या वतीने आज पुणे येथे उच्च शिक्षण संचालक कार्यालयावर धडक मोर्चा व एकदिवसीय धरणे आंदोलन यशस्वीरीत्या पार पडले. राज्यातील अकृषि विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित न्याय मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. सदर मोर्चाचे नेतृत्व अजय देशमुख व माधव राऊळ, रावसाहेब त्रिभुवन यांनी केले. सदर मोर्चासाठी सोलापूर जिल्ह्यातून कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले, सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, सिद्धेश्वर स्वामी, चिदानंद स्वामी, राजेंद्र नरुणे, अजय अट्टेलोर, समाधान बागल, विलास माने, ज्ञानेश्वर कुलकर्णी, भाऊ गायकवाड, बबन गायकवाड, मारुती कोळी, भानुदास गंधुरे, भूषण शिरसकर ,दादा कांबळे ,वैभव नवले हे पुणे येथे उपस्थित होते.
प्रमुख मागण्या :
१) १०, २०, ३० आश्वासित प्रगती योजना लागू करणे
२) सेवानिवृत्तीचे वय ६० करावे
३) जुनी पेन्शन योजना लागू करणे
सदर मोर्चामध्ये शिक्षण संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे डॉ. शैलेंद्र देवलणकर साहेब यांनी मोर्चाला आश्वासित केले की दीपावली नंतर शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील व वित्त विभागाचे संबंधित अधिकारी यांच्या समवेत संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक घेऊन सदर सर्व विषय मार्गी लावण्यात येतील.
मागण्या मान्य न झाल्यास १३ नोव्हेंबर रोजी लेखणी बंद आणि १८ नोव्हेंबर रोजी लाक्षणिक कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.










