दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे .प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा बहुप्रतिक्षित 24 वा हप्ता आज दिनांक 30 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे . या हप्त्याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये थेट स्थलांतरित केले जातील .
एकूण 1835 कोटी रुपये मिळण्याची शक्यता असल्याचे कृषी आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे. गुजरात मधील बनास कांठा येथे शुक्रवारी पीएम किसान उत्सव दिवस साजरा करण्यात येणार आहे .या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते हप्त्याचे ऑनलाईन वितरण होईल .फेब्रुवारी 2019 पासून ही योजना राबविण्यात येत आहे .या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला वर्षाला सहा हजार रुपये तीन समान हप्त्यात दिले जातात. प्रत्येक हप्ता दोन हजार रुपयांचा आहे.
या मदतीमुळे शेतकरी कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे.










