• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
October 29, 2026
in इतर घडामोडी
0
बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : सोलापूरमधील पहिले पंचतारांकित हॉटेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बालाजी सरोवर येथील कोर्टयार्ड रेस्टॉरंटने आदरतिथ्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. द इकॉनॉमिक टाइम्स बिझनेस व्हर्टिकल्सच्या ईटी हॉस्पिटॅलिटीकडून ईटी रेस्टॉरंट्स अँड नाईटलाईफ अवॉर्ड्स २०२६ मध्ये कोर्टयार्ड रेस्टॉरंटला पश्चिम विभागातून ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दि. २८ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील हयात रिजेन्सीमध्ये आयोजित समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी बालाजी सरोवरच्या वतीने गोपाल मिश्रा, रेस्टॉरंट मॅनेजर F&B आणि निखिल कंडपाल, एक्सिक्युटीव्ह किचन यांनी पुरस्कार स्वीकारला.

आदरतिथ्य क्षेत्रातील बदलते प्रवाह, ग्राहकांच्या अपेक्षा, खाद्यसंस्कृतीतील नवनवीन प्रयोग आणि पाहुण्यांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा दर्जा या निकषांवर या क्षेत्रातील कामगिरीची दखल घेतली जाते. या पार्श्वभूमीवर बालाजी सरोवरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला मिळालेला हा पुरस्कार हॉटेलच्या दर्जेदार सेवा आणि खाद्यसंस्कृतीतील योगदानाची पावती मानली जात आहे.

याबाबत बालाजी सरोवरचे महाव्यवस्थापक विवेक जोशी म्हणाले, “भारतातील विविध राज्यांच्या खाद्यसंस्कृतीची ओळख सोलापूरकरांना व्हावी, यासाठी आम्ही दरवर्षी विविध फूड फेस्टिव्हलचे आयोजन करतो. या माध्यमातून देशाच्या विविध भागांतील वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ सोलापूरच्या खवय्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला दर्जेदार खाद्यपदार्थांसोबतच उत्कृष्ट सेवा आणि आनंददायी अनुभव देण्यावर आमचा विशेष भर असतो. पाहुण्यांनी येथे घालवलेला वेळ त्यांच्या कायम स्मरणात राहावा, हेच आमचे उद्दिष्ट आहे.”

बालाजी अमाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “हा पुरस्कार म्हणजे बालाजी सरोवरमधील प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्याने घेतलेल्या मेहनतीची व उत्कृष्ट कामाची दखल आहे. संपूर्ण देशभरातील स्पर्धेतून बालाजी सरोवरची या पुरस्कारासाठी निवड होणे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा सन्मान केवळ बालाजी सरोवरचा नसून संपूर्ण सोलापूरकरांचा आहे.”

या पुरस्कारामुळे सोलापूरच्या आदरतिथ्य क्षेत्राला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली असून, दर्जेदार आदरातिथ्य, विविध खाद्यसंस्कृतींची मेजवानी आणि ग्राहकाभिमुख सेवा यांमधील बालाजी सरोवरच्या प्रयत्नांना आणखी बळ मिळाले आहे.

Previous Post

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

Related Posts

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम
इतर घडामोडी

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

October 29, 2026
कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती
इतर घडामोडी

कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती

October 29, 2026
प्रलंबित आयकर परतावा मार्गी; आयकर अधिकाऱ्यांचा महापालिका आयुक्तांच्या हस्ते सत्कार
इतर घडामोडी

प्रलंबित आयकर परतावा मार्गी; आयकर अधिकाऱ्यांचा महापालिका आयुक्तांच्या हस्ते सत्कार

October 29, 2026
ऊसाला ३५०१ रुपये पहिली उचल द्या; अन्यथा गव्हाण बंद आंदोलन
इतर घडामोडी

ऊसाला ३५०१ रुपये पहिली उचल द्या; अन्यथा गव्हाण बंद आंदोलन

October 28, 2026
कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा भाजपकडून दुष्काळसदृश परिस्थितीमुळे साधेपणाने विजय साजरा
इतर घडामोडी

कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा भाजपकडून दुष्काळसदृश परिस्थितीमुळे साधेपणाने विजय साजरा

October 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

October 29, 2026
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

October 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026