• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Yes News Marathi by Yes News Marathi
October 16, 2026
in इतर घडामोडी
0
खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
0
SHARES
0
VIEWS

सोयाबीनसाठी सर्वाधिक ४०.४६ कोटी रुपयांचा विमा हप्ता; एकूण विमा हप्ता ६६.४० कोटी रुपये

सोलापूर : खरीप हंगाम २०२६ मध्ये पीक विमा योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग नोंदविण्यात आला असून, विविध आठ पिकांसाठी एकूण ३ लाख ३२ हजार ६७० अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांद्वारे ३ लाख ९२ हजार ५४६ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी २ लाख ४१ हजार ८०६ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. पेरणी क्षेत्राच्या तुलनेत विमा संरक्षित क्षेत्राचे प्रमाण ६२ टक्के असून, या पिकांसाठी एकूण ६६.४० कोटी रुपयांचा विमा हप्ता नोंदविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली.

सोयाबीनसाठी सर्वाधिक सहभाग


पीकनिहाय आकडेवारीनुसार सोयाबीन पिकासाठी सर्वाधिक ९४ हजार ४८७ अर्ज प्राप्त झाले आहेत. या पिकाचे १ लाख ३४ हजार ३१९ हेक्टर पेरणी क्षेत्र असून, त्यापैकी ८७ हजार १९५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. पेरणी क्षेत्राच्या तुलनेत विमा संरक्षित क्षेत्राचे प्रमाण ६५ टक्के आहे. सोयाबीनसाठी ४०.४६ कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता नोंदविण्यात आला आहे.

तूर पिकासाठी ७८ हजार ४१६ अर्ज प्राप्त झाले असून, ७६ हजार ४२६ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ५९ हजार ९४५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. या पिकाचे विमा संरक्षित क्षेत्राचे प्रमाण ७८ टक्के असून, एकूण विमा हप्ता २.५२ कोटी रुपये आहे.

मका पिकासाठी ५२ हजार ५१४ अर्ज प्राप्त झाले आहेत. ८२ हजार ८०५ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ३३ हजार १०४ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले असून, त्याचे प्रमाण ४० टक्के आहे. या पिकासाठी ०.३३ कोटी रुपयांचा विमा हप्ता नोंदविण्यात आला आहे.

उडीद, मूग, भुईमूग आणि कांदा पिकांचाही समावेश
उडीद पिकासाठी ३२ हजार ४५४ अर्ज प्राप्त झाले आहेत. ४० हजार २६७ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी २० हजार ४ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले असून, त्याचे प्रमाण ५० टक्के आहे. या पिकासाठी १.०८ कोटी रुपयांचा विमा हप्ता नोंदविण्यात आला आहे.

मूग पिकासाठी ७ हजार ५३५ अर्ज प्राप्त झाले असून, ५ हजार ३४३ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ३ हजार ८०६ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. या पिकाचे विमा संरक्षित क्षेत्राचे प्रमाण ७१ टक्के असून, विमा हप्ता ०.५१ कोटी रुपये आहे.

भुईमूग पिकासाठी १ हजार ८३९ अर्ज प्राप्त झाले आहेत. २ हजार ९८८ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी १ हजार २७ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले असून, त्याचे प्रमाण ३४ टक्के आहे. या पिकासाठी ०.२२ कोटी रुपयांचा विमा हप्ता नोंदविण्यात आला आहे.

बाजरी पिकासाठी ३८ हजार ६७८ अर्ज प्राप्त झाले असून, १७ हजार ५१९ हेक्टर पेरणी क्षेत्रापेक्षा अधिक म्हणजे २२ हजार ७४२ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित असल्याची नोंद आहे. त्यामुळे विमा संरक्षित क्षेत्राचे प्रमाण १३० टक्के दर्शविण्यात आले आहे. या पिकासाठी ०.३१ कोटी रुपयांचा विमा हप्ता नोंदविण्यात आला आहे.

कांदा पिकासाठी २६ हजार ७४७ अर्ज प्राप्त झाले असून, ३२ हजार ८७९ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी १३ हजार ९८४ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. विमा संरक्षित क्षेत्राचे प्रमाण ४३ टक्के असून, या पिकासाठी २०.९८ कोटी रुपयांचा विमा हप्ता नोंदविण्यात आला आहे.

एकूण ६६.४० कोटी रुपयांचा विमा हप्ता

खरीप २०२६ मध्ये पीकनिहाय प्राप्त अर्ज, पेरणी क्षेत्र, विमा संरक्षित क्षेत्र आणि विमा हप्ता यांची आकडेवारी पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांच्या सहभागाचे चित्र स्पष्ट करते. एकूण आठ पिकांसाठी ३ लाख ३२ हजार ६७० अर्जांद्वारे २ लाख ४१ हजार ८०६ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. या सर्व पिकांसाठी एकूण ६६.४० कोटी रुपयांचा विमा हप्ता नोंदविण्यात आला आहे.

Previous Post

विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

Next Post

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

Related Posts

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
Next Post
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

October 16, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

October 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026