• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

Yes News Marathi by Yes News Marathi
October 12, 2026
in इतर घडामोडी
0
बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक
0
SHARES
1
VIEWS

विनापरवाना खरेदी-विक्रीवर कायदेशीर कारवाई होणार – पणन संचालकांचे परिपत्रक जारी

सोलापूर – शेतकऱ्यांकडून बाजार आवाराबाहेर होणाऱ्या फळे, भाजीपाला, आले, लसूण, धणे आणि मिरची या शेतमालाच्या विनापरवाना खरेदी-विक्रीला आळा घालण्यासाठी राज्याचे पणन संचालक संजय कदम यांनी दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे.

महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व नियम १९६७ नुसार शेतमाल उत्पादकांची फसवणूक होऊ नये आणि खरेदीदाराला एकत्रित माल मिळून प्रतवारी ठरवणे सोईचे व्हावे यासाठी नियंत्रित बाजार क्षेत्र स्थापन करण्यात आले आहेत. या कायद्यांतर्गत खाजगी बाजार, थेट पणन परवाना, एकल बाजार परवाना, शेतकरी-ग्राहक बाजार असे पर्याय निर्माण करण्यात आले आहेत.

परिपत्रकातील ठळक मुद्दे :

१) दि. ३१/१२/२०२५ च्या शासन राजपत्रान्वये अधिनियमाच्या कलम ६ मध्ये पोट-कलम (२अ) मध्ये सुधारणा झाली आहे. त्यानुसार “कलम ५(ड) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे लायसन अथवा परवानगी आवश्यक असेल, मात्र अशा परवानाधारकाकडून बाजार समितीला कोणतेही बाजार शुल्क (सेस) आकारता येणार नाही” अशी तरतूद समाविष्ट करण्यात आली आहे.

२) असे असतानाही काही व्यापारी या कार्यालयाकडून किंवा बाजार समित्यांकडून कोणतीही वैध अनुज्ञप्ती / परवाना न घेता बाजार आवाराबाहेर थेट शेतकऱ्यांकडून फळे व भाजीपाला खरेदी करीत असल्याच्या आणि बाजार समिती व खाजगी बाजारात लिलावाशिवाय खरेदी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

पणन संचालकांनी दिलेल्या सूचना :

परवानाच बंधनकारक -* या कार्यालयामार्फत देण्यात येणारे खाजगी बाजार परवाना, थेट पणन परवाना, एकल बाजार परवाना आणि बाजार समितीमार्फत देण्यात येणारा व्यापारी अनुज्ञप्ती / खरेदीदार परवाना धारण करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच अधिसूचित शेतमालाची खरेदी करता येईल.

नियमनमुक्त मालालाही परवाना लागणार -* कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवाराबाहेर फळे आणि भाजीपाला व नोंदीत मसाले – (२- आले), (३- लसूण), (४- धणे) आणि (५- मिरची) हा शेतमाल नियमनमुक्त करण्यात आला आहे. तरीही तो अधिसूचित शेतमाल असल्याने त्याची बाजार आवाराबाहेरील खरेदी संबंधित बाजार समितीकडील व्यापारी अनुज्ञप्ती व थेट पणन परवाना, खाजगी बाजार परवाना, एकल बाजार परवाना धारण करणाऱ्यांनाच करता येईल.

विनापरवाना व्यवहारावर कारवाई – बाजार समित्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या विनापरवाना खरेदी-विक्रीला आळा घालण्यासाठी अधिनियमातील कलम ४६ आणि कलम ५२ नुसार असलेल्या अधिकारानुसार कारवाई करावी.

बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही परिस्थितीत अधिसूचित कृषी उत्पन्नाची विनापरवाना व्यापार होणार नाही याची दक्षता घ्यावी. आले, लसूण, धणे, मिरची या नियमनमुक्त शेतमालावर बाजार फी बसविता येणार नाही. विक्रीस आणलेल्या शेतमालाचे नाव, वजन, बाजारभाव व शेतकऱ्यास द्यावयाची रक्कम याचा तपशील असलेली पावती देणे प्रत्येक व्यापाऱ्यावर बंधनकारक राहील. शेतकऱ्यांनी परवाना नसलेल्या व्यापाऱ्यास माल विकू नये यासाठी जनजागृती करावी.

सदर परिपत्रकीय सूचना सर्व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी आपल्या अधिनस्त तालुका उप / सहाय्यक निबंधक व सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि खाजगी बाजारांना निदर्शनास आणून काटेकोरपणे पालन होईल असे पहावे, असे निर्देश पणन संचालक (महाराष्ट्र राज्य, पुणे) श्री. संजय कदम यांनी दिले आहेत.

Previous Post

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

Next Post

माढा तालुक्यातील तुळशी ग्रामस्थांकडून शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीचे स्वागत

Related Posts

स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी

October 12, 2026
चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
Next Post
माढा तालुक्यातील तुळशी ग्रामस्थांकडून शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीचे स्वागत

माढा तालुक्यातील तुळशी ग्रामस्थांकडून शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीचे स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माढा तालुक्यातील तुळशी ग्रामस्थांकडून शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीचे स्वागत

माढा तालुक्यातील तुळशी ग्रामस्थांकडून शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीचे स्वागत

October 12, 2026
बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026