• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पडद्यावरील भूमिकांना स्वतःच्या आयुष्याचा स्पर्श देणारा ‘आपला नाना’

Yes News Marathi by Yes News Marathi
October 8, 2026
in Blog
0
पडद्यावरील भूमिकांना स्वतःच्या आयुष्याचा स्पर्श देणारा ‘आपला नाना’
0
SHARES
1
VIEWS

स्पष्टवक्तेपणा, संघर्ष आणि संवेदनशीलता यांच्या जोरावर रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारा

अभिनेता विश्वनाथ दिनकर पाटेकर म्हणजेच तुमचा आमचा नाना पाटेकर.

दि. १ जानेवारी १९५१ रोजी मुरुड गावामध्ये नानांचा जन्म झाला. नानांचं बालपण उनाडक्या, दंगामस्ती, खोडकरपणा यात गेलं. अगदी गुन्हेगारीही जवळून पहिली त्यांनी.बालपणीच त्यांचं पितृछत्र हरपलं. आई अतिशय संस्कारी आणि शिस्तप्रिय.शिक्षणासाठी आईने नानांची रवानगी मुंबईला केली. शालेय शिक्षण कसबसं पूर्ण झालं. सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स महाविद्यालयात अप्लाइड आर्ट चं विशेष शिक्षण घेतलं. शिक्षण पूर्ण करत असताना प्रसंगी झेब्रा क्रॉसिंग पेंटिंग, चित्रपटांची पोस्टर्स रंगवण्याचंही काम केलं. ‘भूक आणि अपमान यांनीच अभिनय शिकवला’ असं ते त्यांच्या मुलाखतीत सांगत असत. महाविद्यालयाची शिक्षण सुरू असताना रंगभूमीशीही नातं जुळलं. विजया मेहता, विजय तेंडुलकर यांच्यासारख्या दिग्गज रंगकर्मींच्या मार्गदर्शनाने नानांच्या अभिनयाला आकार मिळाला.

मराठी रंगभूमीपासून सुरू झालेला अभिनय प्रवास हिंदी चित्रपट सृष्टीपर्यंत पोहोचला. गमन, परिंदा, क्रांतिवीर,अग्निसाक्षी, खामोशी,अबतक 56, राजनीति, वेलकम, नटसम्राट अशा अनेक चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या छटा दाखवल्या. प्रहार चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन केलं आणि अभिनयही केला. नानांचा अभिनय म्हणजे त्यांच्या संघर्षमय जीवनाचा अनुभव, डोळ्यात वेदना, आवाजात बंड आणि चेहऱ्यावर आयुष्याने शिकवलेल्या धड्यांची छाया. पडद्यावर अनेकदा रागीट, कठोर, स्पष्टवक्ते दिसणारे नाना प्रत्यक्षात मात्र अतिशय हळवे आणि संवेदनशील. लहान वयातच कष्ट आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागल्यामुळे दुसऱ्याची भूक, पैशाची चणचण, गरिबी, दुष्काळ, उपासमार यांची जाणीव या संवेदनशील मनाला झाली आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून मकरंद अनासपुरे यांच्याबरोबर दुष्काळग्रस्त आणि संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबासाठी काम केलं. संतापलेले, गुन्हेगार, सैनिक, राजकारणी किंवा वेलकम सारख्या चित्रपटातून विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांना लोटपोट हसवणारे नाना जेव्हा नटसम्राट मध्ये एका वृद्ध रंगकर्मीच्या वेदना घेऊन उभे राहिले तेव्हा त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या वेदना, एकटेपणा, संघर्ष त्या भूमिकेमध्ये ओतल्या असाव्यात असं वाटतं. म्हणूनच त्यांच्या अभिनयात कधी कृत्रिमपणा जाणवला नाही.

नानांच्या आयुष्याकडे पाहिल्यानंतर असंच प्रकर्षाने जाणवतं की यशस्वी होण्यासाठी, मोठा माणूस होण्यासाठी पैसा, प्रसिद्धी आणि संपत्ती यापेक्षा संघर्ष करण्याची जिद्द आणि समाजाबद्दलची संवेदनशीलता गरजेची असते. परिस्थिती माणसाला आयुष्यातून उठवू शकते पण त्याच परिस्थितीतून माणूस स्वतःला घडवूही शकतो. प्रसिद्धी, पैसा मिळाल्यानंतरही साधेपणाशी नातं जोडणारा मोठ्या पडद्यावरचा स्टार पण सामान्य माणसांच्या दुःखात उभा राहणारा नाना, संवादा मागची आग, रंगभूमीवरचा कलाकार, पडद्यावरचा नट, नटसम्राट, अन्याय आणि दुःखाविरुद्ध संताप व्यक्त करणारा नाना. त्यांच्या संघर्षाला, कलेला आणि माणुसकीला सलाम. आज नाना पाटेकर नावाच्या नाटकाचा पडदा पडला, प्रकाश विझला, टाळ्यांचा कडकडाट थांबला, रंगमंचा रिकामा झाला. पण नानाच्या आठवणींचा पडदा मात्र कधीच न पडण्यासाठी उघडला.

लेखन
अक्षता केळकर

Previous Post

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

Next Post

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

Related Posts

उजनी धरणातून ठराविक तालुक्यासाठीच बेसुमार पाण्याचा उपसा…पाणीसाठा @85%
Blog

उजनी धरणातून ठराविक तालुक्यासाठीच बेसुमार पाण्याचा उपसा…पाणीसाठा @85%

October 8, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला बार्शी तालुक्याचा आढावा
Blog

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला बार्शी तालुक्याचा आढावा

October 7, 2026
आषाढी वारीतील चष्मे घोटाळा दडपण्याचा प्रयत्न…?
Blog

आषाढी वारीतील चष्मे घोटाळा दडपण्याचा प्रयत्न…?

October 7, 2026
मोडनिंब जलजीवन मिशन कामाचे पाईप जळून खाक…दत्तनगर मधील गणपती मंदिर सापडले आगीच्या भक्षस्थानी
Blog

मोडनिंब जलजीवन मिशन कामाचे पाईप जळून खाक…दत्तनगर मधील गणपती मंदिर सापडले आगीच्या भक्षस्थानी

October 6, 2026
सावळेश्वर दर्ग्याजवळील पुलावर भीषण अपघात; २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
Blog

सावळेश्वर दर्ग्याजवळील पुलावर भीषण अपघात; २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

October 6, 2026
एल निनोचा धोका, राज्यात दहा टक्के पाणी कपात ..!
Blog

एल निनोचा धोका, राज्यात दहा टक्के पाणी कपात ..!

October 5, 2026
Next Post
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक... नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
पडद्यावरील भूमिकांना स्वतःच्या आयुष्याचा स्पर्श देणारा ‘आपला नाना’

पडद्यावरील भूमिकांना स्वतःच्या आयुष्याचा स्पर्श देणारा ‘आपला नाना’

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026