सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल मधून गेल्याच आठवड्यात एका अटकेत असलेल्या तरुणाने फिल्मी स्टाईल मध्ये धूम ठोकली. चोर -पोलीस असा पाठलाग करत तब्बल चार तासांनी त्याला बेड्या ठोकल्या. काल असाच प्रकार सोलापूर बस स्थानकात घडला. एसटी स्टँड मधून प्रवाशाचे पैसे आणि मोबाईल चोरून पळून जाणारे तीन चोर इथे असलेल्या रिक्षावाल्यांनी पकडले. एवढेच नव्हे तर त्या तिघा चोरट्यांना चांगला चोप दिला आणि पोलिसांना बोलवून त्यांच्या हवाली केले. या तिघांनीही चोरीची कबुली दिली असून रामवाडी शहर परिसरातील हे चोरटे आहेत. बस स्थानकात पोलीस चौकी नावालाच आहे मात्र रिक्षावाल्यांनी चांगले काम केल्याबद्दल कौतुक होत आहे.










