• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पुढील आठ दिवसांत पंचनामे पूर्ण करून शासनास अहवाल सादर करणार

Yes News Marathi by Yes News Marathi
September 29, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पुढील आठ दिवसांत पंचनामे पूर्ण करून शासनास अहवाल सादर करणार
0
SHARES
1
VIEWS

प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीचे पंचनामे सुरू
-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

सोलापूर : महाराष्ट्रातील सुमारे ७५ टक्के तालुक्यांमध्ये दि. २६ सप्टेंबर रोजी दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांचा समावेश आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दि. २८ सप्टेंबरपासून पीक नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक मूल्यांकन होऊन त्यांना शासनाच्या मदतीचा लाभ तातडीने मिळावा, यासाठी नियमित पद्धतीने केवळ १० टक्के शेतांचे पंचनामे न करता प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची नोंद करण्यात येणार आहे. त्यानुसार सर्व संबंधित यंत्रणांना पंचनाम्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुढील आठ दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे नियोजन
दि. २८ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आलेले पीक नुकसानीचे पंचनामे पुढील आठ दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पीक नुकसानीचा एकत्रित अहवाल शासनास सादर करण्यात येणार असून, त्यानुसार शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांनी पंचनाम्याबाबत आवश्यक आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार तलाठी, मंडळ अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांच्या पथकांमार्फत प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. पंचनाम्याचे काम विहित कालमर्यादेत पूर्ण करून नुकसानीचा अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पंचनाम्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करून पुढील आठ दिवसांत हे काम पूर्ण करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Previous Post

सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषदेत ‘माहितीचा अधिकार दिन’

Next Post

जागतिक पर्यटन दिनानिमित्त भालेवाडी येथे अभ्यास दौरा यशस्वी

Related Posts

दुष्काळाचा ‘कोरडा’ जीआर; प्रणिती शिंदेंकडून शासन निर्णयाची होळी!
इतर घडामोडी

दुष्काळाचा ‘कोरडा’ जीआर; प्रणिती शिंदेंकडून शासन निर्णयाची होळी!

September 29, 2026
सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांत दुष्काळ, 100 टक्के क्षेत्राचे पंचनामे 8 दिवसांत पूर्ण करा-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांत दुष्काळ, 100 टक्के क्षेत्राचे पंचनामे 8 दिवसांत पूर्ण करा-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 29, 2026
विश्वशांतीदूत डॉ. सुधीर तारे यांचा वाढदिवस श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत उत्साहात साजरा
इतर घडामोडी

विश्वशांतीदूत डॉ. सुधीर तारे यांचा वाढदिवस श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत उत्साहात साजरा

September 29, 2026
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय
इतर घडामोडी

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय

September 29, 2026
कुंभारी येथे पैशाच्या व्यवहारातून मारहाण; ६६ वर्षीय इसमाचा खून ,04 आरोपी ताब्यात
इतर घडामोडी

कुंभारी येथे पैशाच्या व्यवहारातून मारहाण; ६६ वर्षीय इसमाचा खून ,04 आरोपी ताब्यात

September 29, 2026
हृदय शस्त्रक्रियेसाठी १९ बालक मुंबईकडे रवाना;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते बसला हिरवा झेंडा
इतर घडामोडी

हृदय शस्त्रक्रियेसाठी १९ बालक मुंबईकडे रवाना;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते बसला हिरवा झेंडा

September 29, 2026
Next Post
जागतिक पर्यटन दिनानिमित्त भालेवाडी येथे अभ्यास दौरा यशस्वी

जागतिक पर्यटन दिनानिमित्त भालेवाडी येथे अभ्यास दौरा यशस्वी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुष्काळाचा ‘कोरडा’ जीआर; प्रणिती शिंदेंकडून शासन निर्णयाची होळी!

दुष्काळाचा ‘कोरडा’ जीआर; प्रणिती शिंदेंकडून शासन निर्णयाची होळी!

September 29, 2026
सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांत दुष्काळ, 100 टक्के क्षेत्राचे पंचनामे 8 दिवसांत पूर्ण करा-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांत दुष्काळ, 100 टक्के क्षेत्राचे पंचनामे 8 दिवसांत पूर्ण करा-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 29, 2026
विश्वशांतीदूत डॉ. सुधीर तारे यांचा वाढदिवस श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत उत्साहात साजरा

विश्वशांतीदूत डॉ. सुधीर तारे यांचा वाढदिवस श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत उत्साहात साजरा

September 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026