पुणे- सोलापूर महामार्गावर अरण गावाच्या समोर असलेल्या उड्डाणपुलावर एका भरधाव खासगी ट्रॅव्हल बसची एका सिमेंट बलकरला पाठीमागूण जोरदार धडक एक पुरुष प्रवासी गंभीर जखमी तर दोघे किरकोळ जखमी
दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अरण गावाच्या समोर असलेल्या उड्डाणपुलावर उमरगा येथून मुंबई कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल बस क्रमांक AR 20 C 2599 ने मुंबई येथे जाणाऱ्या एका सिमेंट बलकर क्रमांक 32 D 7672 ला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात बस चालकाशेजारी बसलेला एक प्रवासी डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाला असून अन्य दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
सदर अपघात हा एवढा भीषण होता की ट्रॅव्हल बसने सिमेंट बलकरला धडक दिल्यानंतर एक प्रवासी बसमधून खाली पडला होता आणि या अपघातामध्ये खासगी ट्रॅव्हल बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सदर अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉ गोरखनाथ लोंढे आणि रुग्णवाहिका चालक सागर फाटे यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सदर अपघातात गंभीर जखमी झालेल्या पुरुषाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली असून सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील ग्रस्थीपथक विजय साळुंके, चालक अभिजीत गुजरे, वरवडे टोल नाका येथील शिफ्ट इन्चार्ज वैभव गायकवाड, गणेश गोंडावळे आणि मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे अधिकारी किरण आवताडे (PSI) आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, या अपघातामुळे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनमध्ये वाहतूक कोंडी झाली होती वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथकाने वरवडे टोल नाका येथील क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त ट्रॅव्हल बस रस्त्याच्या बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली असून या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीची नावे १) मुकुंद नातू चव्हाण वय ६० वर्षे होद्द्तुर तांडा, तालुका उमरगा जिल्हा धाराशिव,२) सौ इंदू मुकुंद चव्हाण वय ४५ वर्षे रा होद्द्तुर तांडा, तालुका उमरगा जिल्हा धाराशिव ,३) इसाम गुड्डू माडजे वय २५ वर्षे रा तिरकोळी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथील रहिवासी असून या सदर अपघाताची माहिती टेंभूर्णी पोलिस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी यांना वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथकाचे प्रमुख विजय साळुंके यांनी दिली आहे.











