• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दुष्काळ पाहणीसाठी संपूर्ण महसूल प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर; जिल्ह्यात सर्वत्र पिकांची प्रत्यक्ष पाहणी

Yes News Marathi by Yes News Marathi
September 13, 2026
in Blog
0
दुष्काळ पाहणीसाठी संपूर्ण महसूल प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर; जिल्ह्यात सर्वत्र पिकांची प्रत्यक्ष पाहणी
0
SHARES
0
VIEWS

अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच दुष्काळ पाहणी दौरा

सोलापूर : एल-निनोच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दि. १२ व १३ सप्टेंबर रोजी संपूर्ण महसूल प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर उतरले आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी काल दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील दुष्काळी गावांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला होता, तर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी सांगोला व माळशिरस तालुक्यातील गावांची पाहणी केली.

त्याच अनुषंगाने आज अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी उत्तर सोलापूर व मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी गावांना भेटी देऊन पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून उत्तर सोलापूर व मंगळवेढ्यात पाहणी

आजच्या पाहणी दौऱ्यात अप्पर जिल्हाधिकारी श्री. निऱ्हाळी यांनी –

  • बाळे येथे सोयाबीन, उडीद, तूर पिकाची पाहणी केली. पाण्याअभावी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, शासनाकडे प्रस्ताव पाठवून शक्य तितकी मदत करण्यात येईल.
  • भोगाव येथे सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी सोलापूर शहर उत्तरचे तहसीलदार निलेश पाटील व तालुका कृषी अधिकारी माळी उपस्थित होते.
  • देगाव येथे मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
  • माचणूर येथे ई-पीक पाहणी व कांदा पिकाची पाहणी केली.
  • ब्रह्मपुरी, ता. मंगळवेढा येथे पावसाअभावी पीक न घेतलेल्या चालू पड जमिनीची पाहणी केली.

जिल्हाधिकाऱ्यांचा कालचा दौरा

काल दि. १२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी, धोत्री तसेच अक्कलकोट तालुक्यातील वळसंग, कोंडाळी, कुरनूर, कुरनूर धरण, नाविंदगी तर उत्तर सोलापूर तालुक्यातील प्रताप नगर आणि भाटेवाडी या गावांना भेटी दिल्या. त्यांनी सोयाबीन, ऊस, मका पिकांची पाहणी करून पेरणी कधी केली, पाऊस कधीपासून नाही, जमिनीत ओल किती आहे, तसेच पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याची स्थिती याबाबत शेतकऱ्यांकडून माहिती घेतली.

या पाहणी अहवालाचे संकलन करून प्रांताधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल येणार असून, तो तात्काळ शासनाला सादर करण्यात येणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळू शकेल.

Previous Post

निमा संघटना, हरित धारा ग्रुपकडून बीबी दारफळ येथे वृक्षारोपण

Related Posts

निमा संघटना, हरित धारा ग्रुपकडून बीबी दारफळ येथे वृक्षारोपण
Blog

निमा संघटना, हरित धारा ग्रुपकडून बीबी दारफळ येथे वृक्षारोपण

September 13, 2026
देशातील सर्व टोलनाके मार्च 2027 पर्यंत बॅरियरमुक्त आणि डिजिटल केले जाणार..!
Blog

देशातील सर्व टोलनाके मार्च 2027 पर्यंत बॅरियरमुक्त आणि डिजिटल केले जाणार..!

September 12, 2026
धोकादायक शाळा खोल्या, प्रलंबित बांधकामांवर तातडीने कार्यवाही; इंद्रजीत पवार यांचे प्रशासनाला निर्देश
Blog

धोकादायक शाळा खोल्या, प्रलंबित बांधकामांवर तातडीने कार्यवाही; इंद्रजीत पवार यांचे प्रशासनाला निर्देश

September 12, 2026
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप
Blog

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

September 11, 2026
पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश
Blog

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026
निवासी आदर्श सैनिक स्कूल, कुर्डूवाडी येथे विविध पदांसाठी भरती
Blog

निवासी आदर्श सैनिक स्कूल, कुर्डूवाडी येथे विविध पदांसाठी भरती

September 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुष्काळ पाहणीसाठी संपूर्ण महसूल प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर; जिल्ह्यात सर्वत्र पिकांची प्रत्यक्ष पाहणी

दुष्काळ पाहणीसाठी संपूर्ण महसूल प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर; जिल्ह्यात सर्वत्र पिकांची प्रत्यक्ष पाहणी

September 13, 2026
निमा संघटना, हरित धारा ग्रुपकडून बीबी दारफळ येथे वृक्षारोपण

निमा संघटना, हरित धारा ग्रुपकडून बीबी दारफळ येथे वृक्षारोपण

September 13, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026