• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..

Yes News Marathi by Yes News Marathi
September 12, 2026
in इतर घडामोडी
0
जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..
0
SHARES
1
VIEWS

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला, हत्तीवरून काढली जाणार गणपतीची मिरवणूक

सोलापूर- गणेशोत्सवानिमित्त जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळ आणि सोलापूर जनता सहकारी बँक यांच्यावतीने २० सप्टेंबर ते २३ सप्टेंबर दरम्यान दररोज सायं. ६.३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष मल्लिनाथ खुने यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. मंडळाचे यंदा सुवर्ण महोत्सवी अर्थात ५० वे वर्ष आहे.

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे सोमवारी दि.१४ चार हुतात्मा चौकातून ‘श्रीं’ ची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीचे उदघाटन पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते श्रींचे पूजन करून करण्यात येणार आहे. या मिरवणुकीत बँकेच्या १०० कर्मचाऱ्यांचे लेझीम पथक, हत्तीची प्रतिकृती यांचा समावेश असणार आहे. तसेच मंगळवारी दि. १५ सकाळी ९ वाजता अथर्वशीर्ष पठण करण्यात येणार आहे.

व्याख्यानमालेचे उद्घाटन रविवारी दि. २० सायंकाळी ६.३० वाजता जिल्हा पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील पेंडसे राहतील. व्याख्यानमालेच्या उद्घाटनाच्या दिवशी महाराष्ट्रातील समृद्ध पण लोप पावत चाललेली लोककला ‘फोक प्रबोधन’ या नावाने तीन तासांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यावेळी विविध लोकगीते, वाद्यांचे सादरीकरण होणार आहे. सोमवारी दि. २१ शरद पोंक्षे यांचे ‘आजची युवा पिढी व भारत’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

मंगळवारी दि. २२ ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांचा ‘बाबूजी व मी’ हा भावगीत, भक्तीगीत व चित्रपट गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे. तर बुधवारी दि.२३ सुशील कुलकर्णी यांचे ‘आजचा खरा जेन झी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

बौद्धिक व्याख्यानमालेतील प्रत्येक कार्यक्रम दररोज ठीक सायंकाळी ६.३० वाजता सुरू होणार असून बँकेच्या सर्व ग्राहक, सभासद, हितचिंतक आणि सोलापूरकर रसिकांनी या कार्यक्रमांना वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष मल्लिनाथ खुने यांनी केले.

गणेशोत्सव काळात दररोज शहर जिल्ह्यातील मान्यवरांच्या हस्ते गणपती बाप्पांची पूजा करण्यात येणार आहे.

या पत्रकार परिषदेस बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे, संचालक पुरुषोत्तम उडता, संचालिका चंद्रिका चौहान, गौरी आमडेकर, सुरेश चिक्कळी, महादेव न्हावकर, विष्णू मोंढे, ऍड. मल्लिनाथ शहाबादे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य प्रल्हाद कणसावी, सरव्यवस्थापक मकरंद जोशी, सरव्यवस्थापक देवदत्त पटवर्धन, मुख्य जनसंपर्क अधिकारी मदन मोरे, जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष मल्लिनाथ खुने, सचिव सिद्धार्थ गनगोंडा, उपाध्यक्ष अनिल बरगले, सहसचिव पवन रणसुभे, खजिनदार विनायक कुरापाटी उपस्थित होते.

वर्षभर सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची मेजवानी– जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्या यंदाच्या ५० व्या वर्षानिमित्त महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये वर्षभर सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे तसेच राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने बँकेच्या ग्राहक हितचिंतक रसिकांना उत्तमोत्तम कार्यक्रमांची मेजवानी मिळेल, असे मंडळाचे अध्यक्ष मल्लिनाथ खुने यांनी सांगितले.

Previous Post

लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…

Next Post

देशातील सर्व टोलनाके मार्च 2027 पर्यंत बॅरियरमुक्त आणि डिजिटल केले जाणार..!

Related Posts

प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना
इतर घडामोडी

प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना

September 12, 2026
डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026
सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!
इतर घडामोडी

सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!

September 11, 2026
भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब
इतर घडामोडी

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026
अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय
इतर घडामोडी

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026
Next Post
देशातील सर्व टोलनाके मार्च 2027 पर्यंत बॅरियरमुक्त आणि डिजिटल केले जाणार..!

देशातील सर्व टोलनाके मार्च 2027 पर्यंत बॅरियरमुक्त आणि डिजिटल केले जाणार..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देशातील सर्व टोलनाके मार्च 2027 पर्यंत बॅरियरमुक्त आणि डिजिटल केले जाणार..!

देशातील सर्व टोलनाके मार्च 2027 पर्यंत बॅरियरमुक्त आणि डिजिटल केले जाणार..!

September 12, 2026
जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..

September 12, 2026
लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…

लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…

September 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026