क्रीडा भारती अखिल भारतीय स्तरावर क्रीडानज्ञा परीक्षाचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस एक लाख रुपये, द्वितीय बक्षीस पन्नास हजारची दोन, तृतीय बक्षीस पंचवीस हजारचे सहा, अशा बक्षिसांची योजना होती साधारणपणे अखिल भारतीय स्तरावर दोन लाख बत्तीस हजार खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये ऑनलाईन स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात सोलापूरातून पाच हजार दोनशे चौदा इतके खेळाडूंनी सहभाग घेतला आणि त्या अखिल भारतीय स्तरावरील सोलापूरची नाव: शर्वरी राघवेंद्र धर्मट्टी वय:15 वर्ष इयत्ता: 9 वी.,आई: विजयलक्ष्मी राघवेंद्र धर्मट्टी क्रमांक: 3 रा क्रमांक- 25,000 रोख बक्षिस वेळ:4 मिनिट शाळा:विद्या इंग्लिश मीडियम स्कूल मंजरेवाडी, होटगी रोड ,सोलापूर.
या मुलीला तिसरा क्रमांक बक्षीस मिळून पंचवीस हजार रुपयचं रोख बक्षीस मिळालेली आहे. ही मुलगी कबड्डी खेळाडू असून सोलापूरातील विद्या इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेमध्ये इयत्त 9 वी त शिक्षण घेत आहे. प्रशिक्षक अविनाश जाधव आहेत. क्रीडा भारती सोलापूर जिल्ह्याच्या वतीने या मुलीचा आज प्राविण्य मिळवल्याबद्दल प्रात उपाध्यक्ष नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल याच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तिच्यासोबत तिचे पालक, सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर विलास हरपाळे, सोलापूर जिल्हा मंत्री राजेश कळमणकर, अविनाश जाधव, सोलापूर शहर अध्यक्ष सुधीर देव, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अरुण उपाध्ये, सोलापूर जिल्हा सोलापूर शहर मंत्री प्रदीप तडवळकर आदी उपस्थित होते.











