सोलापूरच्या पूर्व भागात फ्रुट बिअरच्या नावाखाली विषारी पदार्थ विकले जात आहेत याबाबत कारवाई करण्यासाठी अन्न औषध प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभाग एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. या फ्रुट बियर मध्ये कोणत्याही प्रकारची फळे नाहीत मात्र विषारी औषधे घालून घाण पाण्यातून या नशिल्या बिअर बनवल्या जात आहेत. यामुळे न्यू पाच्छा पेठ, इंदिरानगर,विनायक नगर, दत्तनगर, माधवनगर,सुनील नगर या भागातील कष्टकरी आणि गोरगरीब लोक ही फ्रुट बियर पीत आहेत. त्यांना सकाळी झोपेतून उठावे हे देखील कळत नाही. लोकांच्या जीवाशी हा एक प्रकारे खेळ आहे. सामाजिक कार्यकर्ते मलया स्वामी यांनी याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यासह सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन उत्पादन शुल्क, विभागाचे भाग्यश्री जाधव अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त देसाई यांना वारंवार निवेदन दिली आहे मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता राज्यात गाजत असणाऱ्या तुकाराम मुंढे यांनीच या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.










