वैद्यकीय तज्ञांकडून स्वागत तर उद्योगजगतातून विरोध.
सोलापूर : पॅकेज्ड खाद्यपदार्थांमधील अतिरिक्त साखर(sugar), मीठ(salt)आणि संतृप्त चरबीबाबत (saturated fat) ग्राहकांना स्पष्ट माहिती मिळावी, यासाठी FSSAI ने लाल रंगाच्या षटकोनी (Hexagonal) इशारा लेबलचा प्रस्ताव दिला आहे. किमान दोन पोषक घटक निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असलेल्या पदार्थांवर हा इशारा देण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे ग्राहकांना पदार्थ खरेदीपूर्वी त्यातील आरोग्यास अपायकारक घटकांची सहज माहिती मिळून जागरूक आणि आरोग्यदायी निवड करण्यास मदत होणार आहे. लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार व कॅन्सर सारख्या जीवनशैलीजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये अतिरिक्त साखर मीठ व संतृप्त चरबी यांचे सेवन महत्वाचे कारण आढळून आले आहे. ते कमी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरू शकतो.
देशातील आरोग्य तज्ञांनी FSSAI च्या निर्णयाला पाठिंबा दिला असून त्यामुळे नागरिकांमध्ये या पदार्थांच्या सेवनावर कंट्रोल येऊ शकते असे त्यांचे म्हणणे आहे.










