• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

Yes News Marathi by Yes News Marathi
August 19, 2026
in Blog
0
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
0
SHARES
10
VIEWS

राज्यात 4 था क्रमांक; खाजगी गुंतवणुकीत 142 कोटींची उभारणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांना पत्र पाठवून या कामगिरीबद्दल अभिनंदन केले.

सोलापूर, दि. 19: जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबवण्यात येत असलेल्या आणि नियोजन विभाग अंतर्गत असलेल्या महास्टाराईड ऑपरेशन (MahaSTRIDE Operation) मध्ये सोलापूर जिल्ह्याने राज्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी राज्यातील 13 जिल्ह्यांची निवड झालेल्या यादीत सोलापूरचा समावेश असून, जिल्ह्याला *16 कोटी रुपयांचे परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह ग्रँट (Performance-Based Incentive Grant) मंजूर करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांना पत्र पाठवून या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.

सोलापूरचा स्कोर आणि क्रमांक
पत्रानुसार सोलापूर जिल्ह्याला यावेळी 82% Composite Score मिळाला आहे. यामुळे राज्यातील 13 पात्र जिल्ह्यांमध्ये सोलापूरचा 4 था क्रमांक लागला आहे. तसेच पुणे विभागातील 4 जिल्ह्यांमध्ये 3 रा क्रमांक मिळाला आहे. जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या District Strategic Plans ची मुख्यमंत्री यांनी विशेष दखल घेतली आहे.

142 कोटी खाजगी भांडवल उभे
मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्याने Annual Strategic Action Plan राबवण्यासाठी जवळपास 142 कोटी रुपयांचे खाजगी भांडवल उभे केले आहे. यामुळे सोलापूर गुंतवणुकीसाठी एक आकर्षक जिल्हा म्हणून पुढे येत आहे. राज्याच्या “विकसित महाराष्ट्र” या संकल्पनेला बळ देण्यात सोलापूरचा मोठा वाटा आहे, असेही त्यांनी नमूद केले.

अनुदानाचा वापर
या कामगिरीच्या सन्मानार्थ सोलापूर जिल्ह्याला 16 कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या अनुदानाच्या वापरासाठीच्या सविस्तर अटी MITRA विभागाकडून जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, जिल्हा प्रशासनाने या गतीने काम करत राहावे. विशेषतः खाजगी भांडवल उभारणी आणि जिल्ह्याचे GDDP म्हणजेच Gross District Domestic Product वाढवण्यासाठी अधिक महत्वाकांक्षी उद्दिष्टे ठेवावीत.

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर झाल्याबद्दल जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला यांनी नियोजन भवन येथे केला. यावेळी नियोजन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्याच्या या यशामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही तो एक आदर्श ठरणार आहे.


Previous Post

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

Next Post

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

Related Posts

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार
Blog

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी
Blog

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी
Blog

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

October 2, 2026
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी
Blog

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 2, 2026
दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?
Blog

दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?

September 29, 2026
सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ सोहळ्यात संतपरंपरेचा जागर
Blog

सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ सोहळ्यात संतपरंपरेचा जागर

September 29, 2026
Next Post
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026