• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

Yes News Marathi by Yes News Marathi
August 19, 2026
in Blog
0
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर : प्रतिनिधीगेल्या ३४ वर्षांपासून मोची समाजाकडून होत असलेल्या शैक्षणिक कामासाठी भूखंड मिळण्याच्या मागणीला अखेर यश आले आहे. आमदार देवेंद्र कोठे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीत ही मागणी मंजूर करण्यात आली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

विशेषतः लष्कर आणि परिसरात प्रामुख्याने असलेल्या मोची समाजाच्या गोरगरीब कामगारांच्या मुलांची शिक्षणाची सोय व्हावी याकरिता श्री जांबमुनी मोची समाजसेवा मंडळाला येथील जागा शाळेकरीता द्यावी अशी मागणी समाजाच्यावतीने आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांची ही मागणी विचारात घेऊन आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता.

आमदार देवेंद्र फडणीस यांच्या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री बावनकुळे यांनी श्री जांबमुनी मोची समाजसेवा मंडळाला ही जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.यापूर्वी हा भूखंड मिळवण्यासाठी मोची समाजातील अनेकांनी तत्कालीन आमदार, खासदार, मुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने मागणी केली होती. परंतु हा प्रश्न सुटला नव्हता. आमदार देवेंद्र कोठे यांनी हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मांडल्यानंतर मात्र या विषयाला गती आली.सोलापूर उत्तर सदर बझार येथील माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असलेली ३ हजार ९१० चौ.मी. जागा श्री जांबमुनी मोची समाज सेवा मंडळाला शैक्षणिक कारणासाठी २३४६ चौरस मीटर क्षेत्र प्रचलित बाजारमूल्याच्या वीस टक्के रक्कम घेऊन कब्जेहक्काने देण्याचा निर्णय घेण्यात आला. क्रीडांगणासाठी १५४६ चौरस मीटर क्षेत्र वर्षाला एक रुपया नाममात्र दराने तीस वर्षासाठी भाडेपट्ट्याने देण्यास मान्यता देण्यात आली.मात्र हा भूखंड़ देताना राज्य शासनाने काही अटी आणि शर्तीही घातल्या आहेत. या जमिनीचा वापर केवळ मंजूर प्रयोजनासाठीच करता येणार आहे. जमिनीचा ताबा मिळाल्यापासून तीन वर्षांच्या आत मंजूर प्रयोजनासाठी वापर सुरू करणे बंधनकारक आहे.

१महसूल विभागाचे क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्यामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सोलापूरला पुन्हा प्रत्यंतरमहसूल विभागाचे क्रांतिकारी निर्णयमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेत आहेत. याचे या निर्णयाच्या निमित्ताने सोलापूरकरांना पुन्हा एकदा प्रत्यंतर आले. बी टू च्या ऐतिहासिक निर्णयानंतर १९९२ पासून रखडलेला मोची समाजाचा शैक्षणिक विषयातील प्रश्न महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गी लावला आहे. कष्टकरी, मागासवर्गीय प्रवर्गातील मोची समाजाच्या शैक्षणिक कामासाठी जमीन उपलब्ध करून दिल्यामुळे येणाऱ्या काळात अनेक चांगले विद्यार्थी घडणार आहेत.

२मोची समाजाने व्यक्त केला आनंदआजवर मोची समाजाचा केवळ राजकीय फायद्यासाठी उपयोग करून घेण्यात आला. मात्र गोरगरीब मोची समाजाला न्याय मिळाला नाही. मोची समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी याकरिता महाराष्ट्राचे विकासाभिमुख मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार देवेंद्र कोठे यांनी मात्र हा विषय मार्गी लावून मोठी समाजाच्या पाल्यांच्या शिक्षणाची सोय केली आहे, असे म्हणत या निर्णयाबद्दल मोची समाजातील समाजधुरिणांनी एकत्र येत आनंद उत्सव साजरा केला.

मोची समाजाला दिलेल्या शब्दपूर्तीचे समाधानमोची समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा शब्द मी विधानसभा निवडणुकीप्रसंगी दिला होता. यातीलच एक टप्पा म्हणजे हा निर्णय आहे. सोलापूर शहरात मोची समाजासह गोरगरीब कामगार वर्गाची संख्या मोठी आहे. त्यांच्या पाल्यांच्या उत्तम शिक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांचे शिक्षण उत्तम होण्यासाठी आवश्यक सर्व मदत शासनाच्यावतीने मिळवून देण्यात येईल.

Previous Post

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा

Next Post

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

Related Posts

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
Blog

अकलुज पोलिसांचा धडाका ; १७ पिस्तुले, ४७ काडतुसे जप्त
Blog

अकलुज पोलिसांचा धडाका ; १७ पिस्तुले, ४७ काडतुसे जप्त

August 19, 2026
श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सूर काही राहिले कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन
Blog

श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सूर काही राहिले कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन

August 19, 2026
प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!
Blog

प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

August 19, 2026
महापौर आणि आयुक्तांचे आदेश धाब्यावर…! हे काम जोमाने सुरूच…
Blog

महापौर आणि आयुक्तांचे आदेश धाब्यावर…! हे काम जोमाने सुरूच…

August 19, 2026
Next Post
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026