• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

Yes News Marathi by Yes News Marathi
August 19, 2026
in इतर घडामोडी
0
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
0
SHARES
46
VIEWS

या शिबिरामध्ये विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांना विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार

31 ऑगस्ट रोजी विमुक्त भटके दिनानिमित्त तालुका व मंडळ स्तरावर प्रमाणपत्र वाटप शिबिराचे आयोजन करावे

सोलापूर- राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ तात्काळ मिळावा यासाठी “भटके विमुक्त समूह दाखला मेळावे” आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार सोलापूर जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी तालुका व मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरात विमुक्त जाती व भटक्या जमातीतील एक ही पात्र नागरिक विविध प्रमाणपत्रे व शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विमुक्त जाती भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना विविध योजनाचा लाभ मिळवून देणे जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी कार्तिकेयेन मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे सहाय्यक संचालक गणेश सोनटक्के, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक जगताप अन्य संबंधित विभागाचे विभाग प्रमुख तसेच अशासकीय सदस्य सुनील पवार, ऍड. निशांत परदेशी, संजय राठोड हे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्तिकेयेन पुढे म्हणाले की, ही 31 ऑगस्ट रोजी विमुक्त भटके दिन अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. 28 29 व 30 सप्टेंबर च्या शिबिरापूर्वी 31 ऑगस्ट रोजी तालुका व मंडळ स्तरावर विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी सर्व तहसीलदार यांनी शिबिरांचे आयोजन करावे व यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून नागरिकांना आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवास व अधिवास दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र अशा विविध कागदपत्रांची पूर्तता करून नागरिकांना त्वरित प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ द्यावा, असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे सहाय्यक संचालक गणेश सोनटक्के यांनी याच विभागाच्या सात ऑगस्ट 2026 रोजीच्या शासन निर्णयाची माहिती बैठकीत दिली. यामध्ये विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी संपूर्ण राज्यभरात एकाच वेळी दिनांक 28, 29 व 30 सप्टेंबर 2026 रोजी शिबिरांचे आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महसूल विभाग, संबंधित योजना विभाग व इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे मेळावे राज्यभरात एकाच दिवशी आयोजित केले जातील.या शिबिरांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर समिती स्थापन करण्यात येणार असून, स्थानिक अधिकारी, कर्मचारी व अशासकीय सदस्यांची उपस्थिती अनिवार्य असेल. मेळाव्याच्या १५ दिवस आधी लाभार्थ्यांची यादी निश्चित करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली जाईल. मेळाव्याच्या दिवशी अर्ज स्वीकारून त्याच ठिकाणी किंवा महिन्याच्या अखेरीस लाभ व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी जिल्ह्यात या पद्धतीने शिबिराचे आयोजन करण्याचे अनुषंगाने परिपत्रक काढून सर्व संबंधित तहसीलदार यांना सुचित केल्याचे सांगितले. यावेळी जिल्हास्तरीय समितीचे अशसकीय सदस्य सुनील पवार, निशांत परदेशी व संजय राठोड यांनी जिल्ह्यातील 34 वस्त्यांचे सर्वेक्षण करून 4 हजार लाभार्थ्यांना विविध दाखले आवश्यक असल्याची माहिती दिली. या दाखल्याचे वाटप 31 ऑगस्ट रोजी होणाऱ्या शिबिरामध्ये करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती मधील लोकांसाठी कार्य करताना येणाऱ्या अडचणी तसेच प्रशासनाकडून आवश्यक असलेल्या मदतीबाबतची माहिती त्यांनी बैठकीत दिली.

या बैठकीस सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व अन्य संबंधित विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
Previous Post

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

Next Post

प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !
इतर घडामोडी

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

October 3, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
Next Post
प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026