महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ; ‘या’ महिन्यात मिळणार 7 महिन्यांची थकबाकी..
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58 टक्क्यांवरून थेट 60% करण्यात आला आहे .महागाई भत्त्यातील हिवाळा पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे जानेवारी 2026 पासून लागू होईल वित्त विभागाने मंगळवारी याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला.
या निर्णयाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ही महागाई भत्ता वाढ १ जानेवारी २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२६ ते ३१ जुलै २०२६ या एकूण ७ महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीचा लाभ मिळणार आहे.महागाईच्या या काळात कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुखकर व्हावे आणि वाढत्या महागाईपासून दिलासा मिळावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.











