महाराष्ट्र शासनाचा अधिकृत सीसीएमपी कोर्स करणाऱ्या होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अर्थात एमएमसी अंतर्गत नोंदणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन ने केलेल्या विरोधामुळे सरकारने स्थगिती दिली आहे. याविरोधात मुंबई येथे होणाऱ्या कृती समिती व सीसीएमपी डॉक्टर्स असोसिएशनच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून पाठिंबा देण्यासाठी तसेच सीसीएमपी पात्र डॉक्टरांचे एमएमसी नोंदणी त्वरित सुरू करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी सोलापूर येथे सीसीएमपी डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी आयोजित पत्रकार परिषद परिषदेत सर्व होमिओपॅथी डॉक्टर संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांनी एकत्रितपणे सीसीएमपी कृती समितीला पाठिंबा जाहीर दिला. शासनानेच हा ब्रीज कोर्स सुरू केला असून अनेक डॉक्टर एक वर्षाचा हा कोर्स रेग्युलेटर लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल पूर्ण करून पास झाले आहेत. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्यांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अंतर्गत होणे अपेक्षित आहे. मात्र आय एम ए संघटनेने यास विरोध दर्शविला आहे. त्याविरुद्ध सीसीएमपी डॉक्टर आक्रमक झालेले दिसून येत आहे.
यावेळी SHDA चे संस्थापक अध्यक्ष – डॉ. सुनिल वराळे सर, सीसीएमपी महाराष्ट्र संचालक डॉ. मिलिंद हिंगमिरे सोलापूर शहर अध्यक्ष डॉ. अक्षय घरबुडे पाटील ,भाजप सेल प्रदेश अध्यक्ष – डॉ. उद्धव इंगोले, सीसीएमपी असोसिएशन सदस्य – डॉ. मंगेश बिराजदार, डॉ. निलेश राठी, राष्ट्रवादी महिला युवती अध्यक्ष – डॉ. प्रतीक्षा चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.










