• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
August 18, 2026
in इतर घडामोडी
0
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन
0
SHARES
6
VIEWS

२१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यभर आयोजन

मुंबई- माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत “महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमात राज्यातील नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने आयोजन करण्यात आलेल्या या उपक्रमाची थीम सेव सॉईल, सेव वॉटर, सीक्यूर टूमारो अशी असून पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा हे घोषवाक्य आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांत २१ ऑगस्ट रोजी कमाल तीन किलोमीटर चालणे आणि मृद व जलसंधारणाची शपथ घेणे असे या कार्यक्रमाचे स्वरूप असल्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

मंत्री संजय राठोड म्हणाले, शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारण हे आवश्यक असून त्याचे महत्त्व पटवून देण्याकरिता राज्यात १५ ते २१ ऑगस्ट, २०२६ दरम्यान “जलसंधारण सप्ताह” आणि १५ ऑगस्ट, २०२६ ते २६ जानेवारी, २०२७ दरम्यान “जलसंधारण अभियान” आयोजित करण्यात येत आहे. तर २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत “महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर” या उपक्रमाचे आयोजन करून जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे कार्य राज्य शासनाने हाती घेतले आहे.

क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी

राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथे होणार असून प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमाच्या आयोजनाचे प्रमुख जिल्हास्तरीय मृद व जलसंधारण समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी हे असणार आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सर्व मंत्री, सर्व राज्यमंत्री, राज्यसभा/ लोकसभा/ विधानपरिषद/ विधानसभा सदस्य, सर्व जिल्हापरिषद अध्यक्ष/उपाध्यक्ष, सर्व महापौर / उपमहापौर, सर्व नगराध्यक्ष/उपनगराध्यक्ष, सर्व जिल्हापरिषद / पंचायत समिती / ग्रामपंचायत सदस्य, सर्व महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत सदस्य आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, सर्व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी, जिल्ह्यातील नामांकित व प्रतिष्ठित व्यक्ती / डॉक्टर / कलाकार/ उद्योजक, जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, माय भारत, नेहरु युवा केंद्र, भारत स्काऊट्स अँड गाईड्स, रेड क्रॉस, होमगार्ड, स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब सदस्य, लायन्स क्लब सदस्य, रनिंग क्लब सदस्य, सायकलिंग क्लब सदस्य, उद्योग व व्यापारी संघटना, सीएसआर भागीदार कंपन्या, विविध क्रीडा संघटना, गुड मॉर्निंग ग्रुप्स, विविध व्यायाम शाळा, स्वयंसेवी संस्था, महिला, राज्याचे नागरिक यांना सहभागी करण्यात येणार आहे.

महा वॉकेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. २१ ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉन मध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. तर प्रथम दहा विजेत्यांना जिल्हास्तरावर सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तर प्रत्येक ‍जिल्ह्यामध्ये प्रायोजकाच्या माध्यमातून एकूण ७१,००० रुपये रकमेची रोख बक्षीस देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम पुरस्कार रुपये २५ हजार रुपये व गौरवचिन्ह, द्वितीय पुरस्कार रुपये १५ हजार रुपये व गौरवचिन्ह आणि तृतीय पुरस्कार १० हजार रुपये व गौरवचिन्ह प्रस्तावित आहे, तसेच प्रत्यक्ष सहभागींच्‍या मधून ईश्वरी चिठ्ठीद्वारे सात सहभागींना प्रत्येकी तीन हजार रुपयांचा विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सोशल मीडियासाठी #MahaWalkathon, #WalkForWater, #SaveSoilSaveWater हे हॅशटॅग वापरण्यात याव्यात, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

Previous Post

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

Next Post

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !
इतर घडामोडी

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

October 3, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
Next Post
एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा

लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा

October 4, 2026
विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

October 4, 2026
शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026