सोलापूरातील पी आर चेस वर्ल्ड अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रथम मुडगी, हिमांशु व्हनगावडे, पृथा ठोंबरे, समरजीत देशमुख, शामे पार्थ, साई गिथिका आणि बाबाजी यांनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ फिडे मानांकन स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या संथगती, जलदगती आणि विद्युतगती प्रकारात आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त केले आहे.
पी आर चेस वर्ल्ड अकॅडमीमध्ये ऑफलाइन तसेच ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारात प्रशिक्षण देण्यात येते. ऑनलाईन मध्ये भारतासह ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, दुबई, इंग्लंड, नॉर्वे व श्रीलंका या देशांतही प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे.
मेहता स्कूल, सोलापूर मध्ये शिकत असलेला प्रथम संजय मुडगी याने जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत १४०८ आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त केले आहे.
सेंट जोसेफ स्कूल, सोलापूर मध्ये शिकत असलेला हिमांशु व्हनगावडे याने विद्युतगती स्पर्धेत १४६१ आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त केले तसेच त्याने जागतिक बुद्धिबळ संघटने कडून अरेना कैंडिडेट मास्टर होण्याचा बहुमान पटकावला आहे.
बार्शीच्या पृथा ठोंबरेने आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करीत संथगती, जलदगती आणि विद्युतगती अशा बुद्धिबळाच्या सर्व प्रकारात अनुक्रमे १४१२, १४५३ व १४०३ आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त केले आहे.
नवी मुंबईच्या साई गिथिकाने सुद्धा आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत १४२५ आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त केले आहे.
धाराशीवच्या समरजीत देशमुखने आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करीत संथगती आणि जलदगती अशा बुद्धिबळाच्या दोन्ही प्रकारात अनुक्रमे १४६६ व १४६४ आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त केले आहे.
नांदेडच्या शामे पार्थ प्रदिप ने आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करीत जलदगती प्रकारात १४४५ आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त केले आहे.
श्रीनगरच्या बाबाजीने पाचव्या काश्मीर आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करीत संथगती प्रकारात १५७२ आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त केले आहे.
प्रथम, पृथा, हिमांशु, समरजीत, पार्थ, गिथिका आणि बाबाजी यांना आंतरराष्ट्रीय पंच व बुद्धिबळ प्रशिक्षक पवन राठी, वरिष्ठ राष्ट्रीय पंच व बुद्धिबळ प्रशिक्षिका रोहिणी तुम्मा आणि राष्ट्रीय पंच व बुद्धिबळ प्रशिक्षिका जयश्री कोंडा यांचे मार्गदर्शन लाभले आहे व तसेच या अकॅडमीत असंख्य जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडत आहेत.










