सोलापूर : प्रिसिजन समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय सुभाष रावजी शहा यांच्या १५ व्या पुण्यस्मरणानिमित्त प्रिसिजन उद्योग समूहात भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रिसिजनचे कार्यकारी संचालक करण शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा तसेच संस्थेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी स्व. सुभाष रावजी शहा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा, उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा आणि समाजाभिमुख कार्याचा उपस्थितांनी गौरवपूर्ण स्मरण केला.
स्व. सुभाष रावजी शहा यांनी उभारलेला प्रामाणिकपणा, गुणवत्ता, नवोपक्रम आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला. त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे आणि दूरदर्शी नेतृत्वामुळे प्रिसिजन समूहाने उद्योग क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली असून, त्यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. तसेच रक्तदान शिबीर ही संपन्न झाले.




















