सोलापूर- सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला जंगम, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर,नगरसेविका श्रीदेवी फुलारी, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका कल्पना कदम, नगरसेवक समाधान आवळे, सुरेश पाटोळे, मधुसूदन जंगम, नागेश खरात, विशाल माने, मध्यवर्ती अध्यक्ष साक्षात लोखंडे, ॲड. शैलेश पोटफोडे, श्रीकांत बोराडे, राजू क्षीरसागर, लखन गायकवाड यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे संस्थापक अभिषेक खंदारे व राजू मिश्रे हे होते. आधारस्तंभ कोमलताई साळुंखे, विशाल खंदारे, उत्सवाध्यक्ष अमित तांबे, उपाध्यक्ष विशाल उखडे, कार्याध्यक्ष यश पांढरे,डीडी पांढरे,पृथ्वीराज मोरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे एड करा











