• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर ग्रामीण पोलिसांचा ऐतिहासिक उपक्रम:एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पंढरपूर आषाढी वारीत 32 लाख भाविकांची अचूक मोजणी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 31, 2026
in Blog
0
सोलापूर ग्रामीण पोलिसांचा ऐतिहासिक उपक्रम:एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पंढरपूर आषाढी वारीत 32 लाख भाविकांची अचूक मोजणी
0
SHARES
2
VIEWS

पंढरपूर: श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी वारी 2026 मध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने सुरक्षेसोबतच गर्दी व्यवस्थापनात एक ऐतिहासिक आणि अत्याधुनिक टप्पा गाठला आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली यंदाच्या वारीत सेंटियंट लॉजिक्स या तंत्रज्ञान संस्थेच्या मदतीने अत्याधुनिक ‘कॉग्निटिव्ह व्हिज्युअल ह्युमन न्यूरल एआय’ तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करण्यात आला. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने 24 ते 26 जुलै दरम्यान पंढरपुरात दाखल झालेल्या 3198129 (सुमारे ३२ लाख) भाविकांची अचूक नोंद करण्यात आली आहे.
तीन दिवसांतील वारकरी आगमनाची अचूक आकडेवारी
एआय प्रणालीने केलेल्या अचूक मोजणीनुसार तीन दिवसांत पंढरपुरात आलेले भाविक:

  • 24 जुलै 2026 रोजी 6,75,274 वारकरी
  • 25 जुलै 2026 (आषाढी एकादशी) रोजी 18,96,573 वारकरी
  • 26 जुलै 2026 रोजी 6,26, 282 वारकरी
    असे एकूण: 31, 98,129 वारकरी भाविकांची नोंद करण्यात आली
    आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच दि. 25 जुलै रोजी सर्वाधिक सुमारे 19 लाख वारकऱ्यांनी पंढरपुरात प्रवेश केल्याचे या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.
    दुबार मोजणी टाळणारे आधुनिक एआय तंत्रज्ञान
    पारंपरिक कॅमेरा पद्धतीमध्ये एकच व्यक्ती विविध कॅमेऱ्यांसमोर आल्यास आकडेवारी फुगण्याची शक्यता असते. मात्र, सोलापूर ग्रामीण पोलिसांनी वापरलेल्या एआय प्रणालीने ही दुबार नोंद पूर्णपणे टाळली.

मुख्य प्रवेशद्वारांवर एआय आयडेंटिटी: सरगम चौक ते इंदिरा गांधी चौक, तीन रस्ता ते दगडी पूल, गोपाळपूर पूल, सावरकर चौक व मिलिटरी हॉस्टेल आणि सांगोला चौक एन्ट्री चा पाचवा मुख्य मार्गांवर खास एआय कॅमेरे बसवण्यात आले होते. व्यक्तीचा चेहरा, कपड्यांचा रंग आणि टोप्यांचा ताळमेळ लावून प्रत्येक वारकऱ्याची एक ‘युनिक एआय ओळख’ तयार केली जात होती.
क्रॉस-कॅमेरा ट्रॅकिंग व पुनर्प्रवेश पडताळणी: वारकरी शहरात फिरताना इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी त्यांना न मोजता एकाच ओळखीने ट्रॅक केले. तसेच शहराबाहेर जाऊन पुन्हा प्रवेश करणाऱ्या भाविकांची जुन्या नोंदीशी पडताळणी करून दुबार मोजणी रोखण्यात आली.

नागरिकांच्या गोपनीयतेचे तंतोतंत पालन

   या मोजणीदरम्यान भाविकांच्या गोपनीयतेची पूर्ण दक्षता घेण्यात आली. भारताचा *'डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अॅक्ट' (डीपीडीपी) आणि जीडीपीआर नियमावलीचे तंतोतंत पालन करण्यात आले असून, कोणत्याही व्यक्तीचा फोटो किंवा वैयक्तिक माहिती सर्व्हरवर सेव्ह करण्यात आलेली नाही.
         "पंढरपूर आषाढी वारी हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक आहे. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि योग्य नियोजनासाठी गर्दीचा अचूक अंदाज असणे अत्यंत आवश्यक असते. पारंपरिक पद्धतींमधील त्रुटी दूर करून यंदा सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून सुमारे 32  लाख युनिक भाविकांची अचूक नोंद केली आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा भविष्यातील गर्दी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होईल. असे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले .
Previous Post

उद्या पंढरीला महापुराचा धोका..? 22 बंधारे पाण्याखाली…

Next Post

भीमेतून एवढे पाणी वाहून जाते..! वडापूरच्या 2 टीएमसी धरणाचे काय झाले..?

Related Posts

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान
Blog

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!
Blog

आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!

September 21, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक
Blog

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक

September 19, 2026
सोलापूरच्या श्यामसुंदर येदूर यांची पुणे संगीत महोत्सवात हार्मोनियमची सुरेल साथ
Blog

सोलापूरच्या श्यामसुंदर येदूर यांची पुणे संगीत महोत्सवात हार्मोनियमची सुरेल साथ

September 17, 2026
जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा -२०२६”  अभियान: सिईओ कुशल जैन यांची माहिती
Blog

जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा -२०२६” अभियान: सिईओ कुशल जैन यांची माहिती

September 16, 2026
Next Post
भीमेतून एवढे पाणी वाहून जाते..! वडापूरच्या 2 टीएमसी धरणाचे काय झाले..?

भीमेतून एवढे पाणी वाहून जाते..! वडापूरच्या 2 टीएमसी धरणाचे काय झाले..?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विद्यार्थी दशेतच आयुर्वेदाचा अंगीकार; निरोगी भविष्यासाठी आहार-विहाराची शिस्त आवश्यक- वैद्य राघवेंद्र नादरगी.

विद्यार्थी दशेतच आयुर्वेदाचा अंगीकार; निरोगी भविष्यासाठी आहार-विहाराची शिस्त आवश्यक- वैद्य राघवेंद्र नादरगी.

September 23, 2026
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कुर्डूवाडी मध्ये दहा लाखाचे एमडी ड्रग्ज पकडले, अमर मुलाणी या आरोपीला अटक

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कुर्डूवाडी मध्ये दहा लाखाचे एमडी ड्रग्ज पकडले, अमर मुलाणी या आरोपीला अटक

September 23, 2026
मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026