• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गण गण गणात बोते ‘च्या अखंड गजराने दुमदुमली जिल्ह्याची वेस! उळे-कासेगाव मार्गे गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापुरात आगमन

Yes News Marathi by Yes News Marathi
July 17, 2026
in Blog
0
गण गण गणात बोते ‘च्या अखंड गजराने दुमदुमली जिल्ह्याची वेस! उळे-कासेगाव मार्गे गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापुरात आगमन
0
SHARES
1
VIEWS

प्रशासनाकडून पारंपरिक पायघड्या

सोलापूर प्रतिनिधी : आषाढी वारी २०२६ च्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना, आज श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीने धाराशिव जिल्हा हद्दीतून तामलवाडीच्या पुढे उळे-कासेगाव मार्गे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. जिल्ह्याच्या वेशीवर पालखी दाखल होताच, सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने व अत्यंत भक्तीमय वातावरणात या भक्तीगंगेचे जंगी स्वागत करण्यात आले.

सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर झालेल्या या भव्य स्वागत सोहळ्याला प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी जातीने उपस्थित राहून माऊलींचे दर्शन घेतले अक्कलकोट मतदार संघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, भाजप प्रवक्ते बोरामणी जिल्हा परिषद गटाचे सदस्य खंडागळे भाऊ उत्तर सोलापूर भाजप तालुका अध्यक्ष संभाजी दडे भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विनायक सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अत्यंत भक्तिभावाने पालखीचे स्वागत केले.

आषाढी वारीसाठी राज्यभरातून पंढरपूरकडे मानाच्या दहा पालख्यांसह शेकडो दिंड्या येत असतात. विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावहून निघालेली ही पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. सहभागी वारकरी ‘विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा’ असा अखंड जयघोष करत, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भजन-कीर्तन करत आनंदाने पुढे मार्गस्थ होत होते. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करूनही अबालवृद्ध वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर कोणताही थकवा नसून केवळ पंढरीच्या दिशेने चालण्याचा आनंद आणि विठ्ठल भेटीची ओढ स्पष्ट दिसत होती.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाने पालखी मार्गावर पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, स्वच्छतागृहे आणि सुरक्षिततेची चोख व्यवस्था केली आहे. हा पालखी सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलीस बंदोबस्त, आरोग्य पथके आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा चोवीस तास सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. आज श्री गजानन महाराजांची पालखी उळे येथे मुक्काम करणार असून, उद्या ही भक्तीगंगा सोलापूर शहरात प्रवेश करेल. प्रशासनाच्या या चोख नियोजनामुळे वारकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Previous Post

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

Related Posts

आपत्कालीन व्यवस्थापनासाठी अग्निशमन वाहने, रेस्क्यू बोटीसह अत्याधुनिक साहित्य सज्ज
Blog

आपत्कालीन व्यवस्थापनासाठी अग्निशमन वाहने, रेस्क्यू बोटीसह अत्याधुनिक साहित्य सज्ज

July 17, 2026
माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी
Blog

विठ्ठलाकडे जाणारा प्रवास की स्वतःला सापडण्याचा? – अमित जोशी

July 16, 2026
सोलापूर जिल्हा परिषद सज्ज..वरिष्ठ पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा पालखी मार्गावर पाहणी दौरा
Blog

सोलापूर जिल्हा परिषद सज्ज..वरिष्ठ पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा पालखी मार्गावर पाहणी दौरा

July 16, 2026
माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी
Blog

माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

July 15, 2026
भारत – यूके मुक्त व्यापार करार आजपासून लागू: 15 जुलै 2026
Blog

भारत – यूके मुक्त व्यापार करार आजपासून लागू: 15 जुलै 2026

July 15, 2026
सोलापूरची कन्या श्रावणी सूर्यवंशीची भारतीय संघात निवड; बँकॉक येथे भारताचे करणार प्रतिनिधित्व
Blog

सोलापूरची कन्या श्रावणी सूर्यवंशीची भारतीय संघात निवड; बँकॉक येथे भारताचे करणार प्रतिनिधित्व

July 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गण गण गणात बोते ‘च्या अखंड गजराने दुमदुमली जिल्ह्याची वेस! उळे-कासेगाव मार्गे गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापुरात आगमन

गण गण गणात बोते ‘च्या अखंड गजराने दुमदुमली जिल्ह्याची वेस! उळे-कासेगाव मार्गे गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापुरात आगमन

July 17, 2026

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026