• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

Yes News Marathi by Yes News Marathi
July 17, 2026
in इतर घडामोडी
0
0
SHARES
2
VIEWS

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून १३ संस्थांचे मनुष्यबळ तैनात; २ मेकॅनिकही नियुक्त

पंढरपूर- आषाढी शुद्ध एकादशी २५ जुलै रोजी होत असून या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीपात्रात वारकरी-भाविकांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने व्यापक नियोजन केले आहे. नदीपात्रात गस्त व बचावकार्यासाठी NDRF सह राज्यभरातील १३ स्वयंसेवी संस्थांचे एकूण १८० आपदा मित्रांचे पथक तैनात करण्यात येत आहे.

या बचाव पथकामध्ये NDRF चे ३० जवान, ठाणे आपदा मित्रचे २ स्वयंसेवक, वाशीम जिल्हा आपदा मित्रचे १० स्वयंसेवक, आपत्ती संघ पिंपरी-चिंचवडचे १० स्वयंसेवक, वन्यजीव रेस्क्यू पुणेचे १० स्वयंसेवक, मुळशी आपत्ती समिती पुणेचे १० स्वयंसेवक, हेल्पिंग हॅण्ड शिरोळ (कोल्हापूर) चे २० स्वयंसेवक, सारथी फाउंडेशन सोलापूरचे १० स्वयंसेवक, चंद्रभागा रेस्क्यू फाउंडेशन कान्हापुरी (जि. सोलापूर) चे १० स्वयंसेवक यांचा समावेश आहे. याशिवाय पंढरपूर शहरातील कोळी समाजातील होडीवाल्यांचे ३० जणांचे आदिवासी रेस्क्यू पथक, सोलापूर येथील रेड फेरी ग्रुपच्या १५ महिला बचाव स्वयंसेविका, महाराष्ट्र रेस्क्यू फाउंडेशन पंढरपूरचे ५ स्वयंसेवक आणि सोलापूर जिल्ह्यातील २० पोलीस पाटील यांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे.

सर्व आपदा मित्र स्वयंसेवक असल्याने १० ते १५ टक्के संभाव्य ड्रॉपआऊट गृहीत धरूनही पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध राहील, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. यासोबतच बचावकार्यातील बोटी व इतर यंत्रसामग्रीच्या तांत्रिक देखभाल-दुरुस्तीसाठी २ अनुभवी मेकॅनिकही संपूर्ण वारी कालावधीसाठी पंढरपूर येथे नियुक्त करण्यात आले आहेत.

आषाढी यात्रा कालावधीत लाखो भाविक चंद्रभागा नदीत स्नानासाठी उतरत असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी नदीपात्रात बोटीद्वारे २४ तास गस्त ठेवण्यात येणार आहे. सर्व बचाव पथकांकडे लाईफ जॅकेट, लाईफ बॉय, रोप व इतर अत्याधुनिक बचाव साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. नदीकाठावर निरीक्षण मनोरे उभारून तेथूनही सतत लक्ष ठेवले जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी सर्व पथकांना प्रशिक्षण व सूचना देण्यात आल्या असून नियंत्रण कक्षाशी समन्वय ठेवून काम करण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिले आहेत.

Previous Post

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

Next Post

गण गण गणात बोते ‘च्या अखंड गजराने दुमदुमली जिल्ह्याची वेस! उळे-कासेगाव मार्गे गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापुरात आगमन

Related Posts

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..
इतर घडामोडी

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश
इतर घडामोडी

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे
इतर घडामोडी

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026
रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप
इतर घडामोडी

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

September 24, 2026
Next Post
गण गण गणात बोते ‘च्या अखंड गजराने दुमदुमली जिल्ह्याची वेस! उळे-कासेगाव मार्गे गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापुरात आगमन

गण गण गणात बोते 'च्या अखंड गजराने दुमदुमली जिल्ह्याची वेस! उळे-कासेगाव मार्गे गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापुरात आगमन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026