• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मानाच्या पालखीसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

Yes News Marathi by Yes News Marathi
July 8, 2026
in इतर घडामोडी
0
मानाच्या पालखीसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
0
SHARES
2
VIEWS

जिल्हा प्रशासनाकडून पालखी प्रमुखाशी समन्वय असावा व त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक पालखीसाठी एक नोडल अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालख्या पुणे येथे आल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था व स्वच्छता अनुषंगाने 12 अधिकाऱ्यांची नियुक्ती, पुणे येथूनच ते सोबत राहणार

सोलापूर जिल्ह्यात पालखी प्रवेशावेळी प्रत्येक नोडल अधिकाऱ्यांनी पालखीचे स्वागत करणे बंधनकारक

सोलापूर-आषाढी शुद्ध एकादशी 25 जुलै 2026 रोजी आहे. या अनुषंगाने मानाच्या पालख्या 16 जुलै पासून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतात. त्यावेळी त्यांच्या मुक्काम, रिंगण, विसाव्याच्या ठिकाणी तसेच रस्ते मार्गावर त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याचा समन्वय साधण्यासाठी प्रत्येक मानाच्या पालखीसाठी एका नोडल अधिकाऱ्याची व त्यांना सहाय्यक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. या सर्व अधिकाऱ्यांनी पालखी प्रमुखाशी समन्वय ठेवून सोपवलेली जबाबदारी एक “टीम वर्क” म्हणून पार पाडून वारी यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी केले.

   मानाच्या पालख्यांसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकारी सहाय्यक अधिकारी तसेच शौचालयाची तपासणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तीकेयन दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, अमोलसिंह भोसले, सुमित शिंदे, नगरपालिका प्रशासन सह आयुक्त आशिष लोकरे, तहसीलदार सैफन शेख, तहसीलदार सरस्वती पाटील, जिल्हाधिकारी कार्यालयात तर सर्व नियुक्त केलेले अधिकारी ऑनलाईन द्वारे उपस्थित होते.

  जिल्हाधिकारी कार्तीकेयन म्हणाले की, सर्व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडावी. आज पासूनच नियुक्त केलेल्या पालखी प्रमुखाशी बोलून घ्यावे. तसेच पालखी सोलापूर जिल्ह्यात आल्यानंतर पालखी समवेत राहून पालखीच्या मुक्काम, विसावा रिंगण या ठिकाणाला भेटी द्याव्यात. तसेच रस्ते मार्गाची पाहणी करावी. पाहणी दरम्यान अडचणी असतील त्याबाबतची माहिती तात्काळ प्रशासनाला कळवावी. तसेच पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताना संबंधित नोडल अधिकारी यांनी पालखीचे यथोचित स्वागत करण्याबाबतचे निर्देशही त्यांनी दिले.

 संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पालखी समवेतच राहणे बंधनकारक आहे. तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी रात्रीच्या व सकाळच्या वेळेला विज पाणी व शौचालयाची समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्याबाबत अगोदरच माहिती घेऊन त्या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी स्पष्ट केले.    त्याप्रमाणेच मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन शौचालयाची व्यवस्था उत्कृष्ट पद्धतीने करण्यासाठी स्वतंत्र दोन टीम च्या माध्यमातून 12 अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. या अधिकाऱ्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत पुणे येथून राहून मुक्कामाच्या ठिकाणी पुरवठादारने दिलेल्या शौचालयाची पाहणी करावी ते व्यवस्थित आहेत का याची खात्री करावी तसेच एका ठिकाणाहून पुढच्या ठिकाणी ते योग्य वेळेत पोहोचले पाहिजेत या दृष्टीने त्यांच्याशी संवाद ठेवून कार्य करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी सांगितले. तसेच या टीमने दिवसातून सकाळ दुपार व रात्री असे तीन वेळा कॉल करून प्रशासनाला माहिती देणे आवश्यक असल्याचे सांगितले. 

 प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी सर्व मानाच्या पालखी प्रमुखांशी तसेच पुणे येथून पालख्या सोबत शौचालयाची व्यवस्था पाहणी व पुरवठादार यांच्याशी समन्वय ठेवण्याच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्याची माहिती सविस्तरपणे सांगितली. व दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी निर्देशित केले.

Previous Post

आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन

Next Post

भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

Related Posts

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
Next Post
भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026