उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद बोलवली होती. त्यामुळे ते नेमके काय बोलणार याची उत्सुकता होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भाजप विरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे.
अयोध्येतील राम मंदिरात मोठ्या प्रमाणात दान केलेले पैसे लुटल्याचे समोर आले आहे. त्या विरोधात ठाकरे आक्रमक झाले. ते म्हणाले, “९० च्या दशकात वाजपेयी म्हणाले होते की ‘अब हिंदू मार नहीं खायेगा’, तसेच आज मी म्हणतोय की ‘अब हिंदू माफ नहीं करेगा’. जे जे देव आणि मंदिरे लुटतायत मग ते भाजपचे असोत वा इतर कोणी त्यांना हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.”
या विरोधाची रविवारी (५ जुलैला) संध्याकाळी ४ वाजता दादर येथील जुन्या कबुतरखान्याजवळील मारुती मंदिरासमोरून ‘रामरक्षा’ आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.











