• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उड्डाणपुलासह पाणीपुरवठा आणि आयटी पार्क, विमानसेवेचा विषय मुख्यमंत्र्यांकडून लागला मार्गी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 3, 2026
in Blog
0
उड्डाणपुलासह पाणीपुरवठा आणि आयटी पार्क, विमानसेवेचा विषय मुख्यमंत्र्यांकडून लागला मार्गी
0
SHARES
5
VIEWS

मनपाच्या रोजंदारी आणि वाहन चालकांचा विषयही सुटणार लवकरच : पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती, आमदार देवेंद्र कोठे यांचा यशस्वी पाठपुरावा

सोलापूर- सोलापूर शहरातील दोन उड्डाणपूल बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या पोस्ट आणि रेल्वे खात्याच्या तसेच राज्य शासनाच्या जागा पुढील १५ दिवसात ताब्यात घेऊन ऑगस्टपूर्वी वर्क ऑर्डर देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले. तसेच शहराच्या अंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी मंजूर झालेल्या १ हजार ४०० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची निविदा १५ सप्टेंबर पर्यंत प्रकाशित करून ३० नोव्हेंबरच्या आत वर्क ऑर्डर काढण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. शहर विकासाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आयोजित बैठकीत आढावा घेतला. याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माहिती दिली. या विविध निर्णयांमुळे आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

या बैठकीस ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार देवेंद्र कोठे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, विमान प्राधिकरणाचे दीपक कपूर, वरिष्ठ अधिकारी श्रीकर परदेशी, नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंद राज आदी उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, उड्डाणपुलाचा विषय शासकीय जागांचे प्रश्न सुटत नसल्यामुळे प्रलंबित होता. आमदार देवेंद्र कोठे यांच्या विनंतीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक घेऊन उड्डाणपुलाचा प्रश्न सोडवला आहे. शासनाच्या जमिनी मोफत देण्यासाठी मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या जागा विनामूल्य देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. पुढील दीड ते दोन महिन्यात उड्डाणपुलाची वर्क ऑर्डर निघून कामाला सुरुवात होईल, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

शहर पाणीपुरवठा योजनेसाठी १५ सप्टेंबरपर्यंत निविदा प्रकाशित करून ३० नोव्हेंबरच्या आत वर्क ऑर्डर देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. समांतर जलवाहिनीचे काम झालेले असले तरी शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी अंतर्गत पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या बदलण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता मंजूर झालेल्या योजनेसाठी जागतिक बँकेचा हिस्सा, राज्य शासनाचा हिस्सा, मनपाची भूमिका या विषयावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. पाकणी येथील जलशुद्धीकरण प्रकल्प बाबतचे राज्यातील सर्व अडथळे संपले असून राज्याकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. केंद्राकडून त्याला लवकरच मान्यता मिळणार आहे, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

सोलापूरच्या विमानसेवेबाबतही यावेळी चर्चा झाली. विमानसेवा पूर्ववत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून संबंधित कंपनीला नोटीस देण्याबाबत देखील सांगण्यात आले आहे. दृश्यमानता असेल तर विमानसेवा सुरू राहिलीच पाहिजे, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह आहे. सोलापुरातील नाईट लँडिंग, विमानतळ परिसरातील अतिक्रमणाच्या विषयावरही यावेळी चर्चा करण्यात आली. बोरामणी येथील विमानतळ उभारणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेत याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र नागरी विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक कपूर यांना दिले.

१५ ऑगस्टपर्यंत सोलापूर शहरासाठी किमान २५ ई-बस मिळाव्यात याबाबतही यावेळी चर्चा झाली. सोलापूर महानगरपालिकेच्या २४९ रोजंदारी आणि वाहन चालकांना कायम सेवेत घेण्याचा विषय कोल्हापुर महानगरपालिकेच्या धर्तीवर तातडीने मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंद राज यांना सूचना दिल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.

आयटी पार्कसाठी ७ दिवसांत जागा

सोलापूरच्या आयटी पार्कसाठी जलसंपदा खात्याची जागा सात दिवसात विनामूल्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन त्याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत दिल्या.

पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे या जोडीचा विकासकामांचा धडाका

अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेले उड्डाणपूल, पाणीपुरवठा योजना, आयटी पार्क, विमानसेवा, बस सेवा तसेच महापालिकेच्या रोजदारी आणि वाहन चालकांचा विषय असे अनेक सोलापूर शहर विकासाचे प्रश्न घेऊन पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी एकत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत विकासकामांचा धडाका लावल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे शहर विकासाचे प्रश्न मार्गी लागत आहेत.

शहर विकासाच्या प्रवासातील मैलाचा दगड

पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली बैठक आणि निर्णय म्हणजे सोलापूर शहराच्या विकासाच्या प्रवासातील मैलाचा दगड ठरणारे आहेत. उड्डाणपूल, पाणीपुरवठा, विमानसेवा, आयटी पार्क अशा अनेक विषयात आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार आणि आमदार देवेंद्र कोठे यांचे अभिनंदन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर शहर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आग्रही आहेत हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. भाजपाने सोलापूरकरांना दिलेला विकासाचा शब्द आम्ही पूर्ण करत आहोत.
— जयकुमार गोरे, पालकमंत्री, सोलापूर

मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे आभार

सोलापूर शहराच्या नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा विषय असलेल्या उड्डाणपूल, पाणीपुरवठा, आयटी पार्क, विमानसेवा, ई बस तसेच महापालिकेच्या रोजंदारी आणि वाहन चालकांचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अत्यंत सकारात्मक पावले उचलली आहेत. शहर विकासाचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे सोलापूरकरांचे आभार.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

Previous Post

रविवारी मुंबईत रामरक्षा आंदोलन ..! उद्धव ठाकरे यांची घोषणा …

Next Post

उड्डाणपुलाचे नोव्हेंबर अखेर टेंडर, IT पार्क होटगी रोडलाच होणार…!

Related Posts

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी
Blog

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर
Blog

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

August 21, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत
Blog

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026
भाजपची सोलापुरात पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटनात्मक बैठक सुरु
Blog

भाजपची सोलापुरात पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटनात्मक बैठक सुरु

August 20, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
Blog

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना
Blog

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026
Next Post
उड्डाणपुलाचे नोव्हेंबर अखेर टेंडर, IT पार्क होटगी रोडलाच होणार…!

उड्डाणपुलाचे नोव्हेंबर अखेर टेंडर, IT पार्क होटगी रोडलाच होणार…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026