• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

Yes News Marathi by Yes News Marathi
June 30, 2026
in Blog
0
जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या   -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
0
SHARES
5
VIEWS

जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या ऐतिहासिक निर्णयातून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर प्रथमच 90 कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशन पद्धतीने पूर्णपणे पारदर्शकपणे करण्यात आल्यापसंतीक्रम, प्राधान्यक्रम व यापूर्वीची सेवा यांचा विचार करून पदे उपलब्ध करून दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले.लोकाभिमुख व पारदर्शी बदली प्रक्रियेबद्दल तलाठी संघटना, महसूल कर्मचारी संघटना व वाहनचालक संघटनेने प्रशासनाचे विशेष आभार मानले.

सोलापूर, दि. 30 : सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सर्व शाखांतर्गत 90 कर्मचाऱ्यांच्या बदल्या यंदा प्रथमच समुपदेशन पद्धत तसेच संगणकीय प्रणालीचा प्रभावी वापर करून करण्यात आल्या. जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी महसूल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाद्वारे पारदर्शकपणे पूर्ण केल्या असून कर्मचारी वर्गामध्ये समाधान असल्याने कार्यालयीन कामकाजाला गती मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

90 कर्मचाऱ्यांचे बदली ज्ञापन प्रसिद्ध

जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरच्या आस्थापनेवरील विविध संवर्गाच्या नियतकालिक बदली 2026 च्या अनुषंगाने दि. 18/06/2026 रोजीच्या ज्ञापनाद्वारे महसूल सहाय्यक-16, सहाय्यक महसूल अधिकारी-26, ग्राम महसूल अधिकारी-32, मंडळ अधिकारी-11 व वाहनचालक-5 अशा एकूण 90 कर्मचाऱ्यांचे बदलीचे ज्ञापन प्रसिद्ध करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाच्या 9 एप्रिल 2018 च्या शासन निर्णयातील टप्पा क्र. 05 (4) नुसार सर्व विभागातील रिक्त पदे समप्रमाणात भरावीत तसेच अवघड क्षेत्रातील पदे प्राथम्याने भरण्याबाबत निर्देश आहेत.

दि. 30 जून रोजी समुपदेशन प्रक्रिया

नागरी सेवा मंडळाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या उपस्थितीत दि. 30.06.2026 रोजी सर्व संवर्गातील अधिकाऱ्यांना समुपदेशनासाठी बोलविण्यात आले. समुपदेशनाद्वारे बदलीची शिफारस करताना कर्मचाऱ्यांचा पसंतीक्रम, प्राधान्यक्रम व यापूर्वी सेवा केलेली ठिकाणे यांचा विचार करून प्रशासनाची निकड लक्षात घेण्यात आली. प्रथम सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचे पसंतीक्रम व प्राधान्यक्रमानुसार पद निवडण्याची संधी देण्यात आली. उर्वरित कर्मचाऱ्यांना समानीकरणाअंती उपलब्ध पदे निवडण्याची मुभा देण्यात आली.

SIR-2026 मधील कर्मचाऱ्यांसाठी विशेष निर्देश

ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व सहाय्यक महसूल अधिकारी संवर्गातील ज्या कर्मचाऱ्यांना विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 साठी नेमणूक करण्यात आली आहे, त्यांना कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित कार्यालय प्रमुखांना देण्यात आले आहेत.

प्रथमच संगणकीय सॉफ्टवेअरचा वापर

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील सर्व संवर्गाचे नियतकालिक बदली-2026 चे कामकाज लोकाभिमुख व पारदर्शी पद्धतीने पार पडले. पहिल्यांदाच संगणकीय सॉफ्टवेअर प्रणालीचा वापर करून बदली प्रक्रिया राबविल्याने सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाची निकड लक्षात घेऊन कार्यवाही केल्याने सर्वांना पसंतीक्रमानुसार बदली करणे शक्य नसले तरी प्रक्रिया पारदर्शक झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

बदली झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये समाधान

समुपदेशन पद्धतीने बदली झाल्याने सर्व संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार बदली मिळाल्याने काम करण्याचा उत्साह वाढला आहे. कोणत्याही तक्रारीविना बदली प्रक्रिया पूर्ण झाल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. याबाबत तलाठी संघटना, महसूल कर्मचारी संघटना तसेच वाहनचालक संघटनेने प्रशासनाचे आभार मानले आहेत.महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील नियम 3(1) नुसार पदावधी पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची नियतकालिक बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, सामान्य प्रशासन विभागाच्या 9 एप्रिल 2018 च्या शासन निर्णयानुसार स्वीकारलेल्या समुपदेशन धोरणानुसार सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील बदल्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.

Previous Post

आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

Next Post

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

Related Posts

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी
Blog

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!
Blog

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !
Blog

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026
श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६
Blog

श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६

October 13, 2026
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता
Blog

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026
मराठी सिनेविश्वाच्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन..!
Blog

मराठी सिनेविश्वाच्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन..!

October 12, 2026
Next Post
महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026