• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
June 13, 2026
in Blog
0
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर – महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी येथील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे तसेच सर्व संबंधित तहसीलदार अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे यांनी प्रशिक्षणासाठी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वागत केले. निवडणुकीसाठी मतदानाचे सहा केंद्र असून दोन उमेदवार आहेत. या निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण 616 मतदार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

निवडणूक जाहीर व आचारसंहिता दिनांक 18 मे 2026 रोजी लागू होणार असून मतदान दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत होईल. मतमोजणी 22 जून 2026 रोजी करण्यात येणार आहे.

मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदारांची यादी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरविली जाईल. संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या मतदान केंद्रावर ज्या मतदारांची यादी प्राप्त झाली आहे, त्या यादीची प्रथम खात्री करून घ्यावी. नगरपंचायत व नगरपरिषद केंद्रांमध्ये मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदारांना ओळखण्यासाठी व्हिडिओ-सीईओ व संबंधित अधिकारी/प्रतिनिधी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मतदान अधिकारी/कर्मचारी नियुक्तीमध्ये क्षेत्रीय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष म्हणून तहसीलदार, मतदान अधिकारी क्र. 1 म्हणून नायव तहसिलदार, मतदान अधिकारी क्र. 2 म्हणून अव्वल कारकून, मतदान अधिकारी क्र. 3 म्हणून अव्वल कारकून/लिपिक आणि मतदान कर्मचारी म्हणून 1 शिपाई यांचा समावेश करण्यात आला आहे. मतदारांची ओळख पटविण्यासाठी स्थानिक स्वराज संस्थेचे मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली असल्याचे सांगण्यात आले.

प्रशिक्षणात मतदानपद्धतीसह मतपत्रिकेच्या नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली. स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर पसंतीक्रम देणे आवश्यक आहे. पसंतीक्रम हा अंकात 1 पासून लिहायचा असून तो मराठी, इंग्रजी, रोमन किंवा भारतीय घटनेतील आठव्या अनुसूचीतील कोणत्याही भारतीय भाषेतील अंकात लिहिण्यास मुभा आहे, मात्र शब्दात लिहिता येणार नाही. भारत निवडणूक आयोगाने पुरविलेला जांभळा स्केचपेन वापरणे बंधनकारक आहे. एकाच उमेदवाराला किंवा एकापेक्षा अधिक उमेदवारांना एकसारखा पसंतीक्रम देता येणार नाही, तसेच पसंतीक्रमांव्यतिरिक्त इतर कोणताही मजकूर लिहू नये, असेही स्पष्ट करण्यात आले.

खालील परिस्थितीत मतपत्रिका अवैध ठरणार असल्याचेही सांगण्यात आले: ज्यावर 1 हा अंक नमूद केलेला नसेल; एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावांसमोर 1 दिला असेल; 1 असा लिहिलेला असेल की तो कोणत्या उमेदवारासाठी आहे याबाबत शंका निर्माण होईल; एका उमेदवाराच्या नावासमोर 1 आणि त्यासोबत इतर अंक नमूद असतील; मतपत्रिकेवर अशी खूण किंवा लिखाण असेल ज्यावरून मतदाराची ओळख पटू शकते; किंवा जांभळ्या स्केचपेनशिवाय अन्य कशाने अंक नमूद केलेला असेल.

मतपत्रिकेबाबत माहिती देताना मतपत्रिका इंग्रजी व मराठी भाषेत असून रंग गुलाबी असल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक मतपत्रिकेला काउंटर फाईल असून त्यावरील नोंदींमध्ये मतदार यादी भाग क्रमांक, मतदारांचा अनुक्रमांक आणि मतदाराची स्वाक्षरी/अंगठा यांचा समावेश आहे. मतदान केंद्रावरील पथकाने मतपत्रिका तपासून नाव व्यवस्थित छापले आहे की नाही, मतदार संख्या व मतपत्रिका किती आहेत याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले.

निवडणूक साहित्य ताब्यात घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या. दिनांक 17/06/2026 रोजी सकाळी 9.00 वा. नियोजन भवन सोलापूर येथे साहित्य वितरण होणार असून साहित्य वितरण केंद्रावर वेळेवर उपस्थित राहून साहित्य ताब्यात घ्यावे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय सोडण्यापूर्वी तसेच मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर साहित्याची खात्री पुन्हा-पुन्हा करावी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे अहवाल द्यावा, असे सांगण्यात आले.

महत्त्वाच्या साहित्याची तपासणी मतदान केंद्राध्यक्षांनी स्वतः करून घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये मतपेटी, मतपत्रिका, जांभळ्या शाईचा स्केचपेन, हिरवे पेपर सील व अॅड्रेस टॅग, संविधानिक/असंविधानिक नमुने व लिफाफे, मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी/घोपणापत्र, मतदार यादीच्या चिन्हांकित प्रती, पक्क्या शाईचा पेन/शाईची बाटली, विभेदक चिन्ह असलेला रबरी शिक्का, तसेच उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधी यांच्या नमुना स्वाक्षरीची प्रत यांचा समावेश असल्याचे प्रशिक्षणात नमूद करण्यात आले. सिलींग साहित्य म्हणून पितळी सिल व लाख, ढकलपट्टी, इशारा फलक यांचाही उल्लेख करण्यात आला.

मतदार यादीबाबतही प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात आले. आपल्याच मतदान केंद्राची मतदार यादी प्राप्त झाल्याची खात्री करणे, मतदार संख्या पडताळणे, सर्व पृष्ठे आहेत का, अनुक्रमांक सलग आहेत का, तसेच मतदार यादीच्या इंग्रजी 2 व मराठी 2 प्रती प्राप्त झाल्या आहेत का, याची तपासणी करावी, असे सांगण्यात आले.

मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर मतदान केंद्र आदेशातील ठिकाण, इमारत व खोली निश्चित ठिकाणी असल्याची खात्री करावी. पुरेसे फर्निचर व दिवाबत्ती उपलब्ध आहे का, याचीही तपासणी करावी. मतदान केंद्राच्या ठिकाणी राजकीय नेते/पक्षचिन्हे वगैरे फोटो किंवा पक्षाशी साधर्म्य असलेली चित्रे असल्यास ती झाकून ठेवणे किंवा फोटो उलटे करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. मतदान केंद्राच्या बाहेर मतदान केंद्र व त्या ठिकाणी मतदान करणाऱ्या मतदारांचा तपशील दर्शविणारी नोटीस लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

मतदान प्रतिनिधींना नेमणूक पत्र घेऊन येण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रतिनिधींची ओळख त्यांच्या नेमणूक पत्रातील उमेदवार निवडणूक प्रतिनिधी यांच्या सहीची खात्री निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने पुरविलेल्या सहीच्या नमुन्यावरून करून करणे आवश्यक आहे. प्रतिनिधी हा त्या विधानपरिषद मतदारातील असणे बंधनकारक असल्याचेही सांगण्यात आले. एका उमेदवाराला एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त तीन प्रतिनिधींची नेमणूक करता येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

मतदान गुप्त राहण्यासाठी 100 मीटर परिसरात सुरक्षा यंत्रणा राबवावी. सर्व मतदान पथकाने मतदान केंद्रावर वेळेच्या तीस मिनिटे अगोदर उपस्थित राहून गोपनीयतेची शपथ घ्यावी. गोपनीयतेचा अभंग केल्यास शिक्षा होऊ शकते, तसेच मतदान केंद्राच्या परिसरात फोटो काढण्यावर बंदी असल्याचे सांगण्यात आले. मतपेटीमध्ये मतपत्रिका टाकली जाते की नाही याची खात्री करणेही बंधनकारक ठरणार आहे. मतदान केंद्रात कोणत्याही मतदाराला मोबाईल/स्मार्टवॉचसारखी उपकरणे घेऊन जाता कामा नये. मतदान झाल्यानंतर मतपत्रिका कोणालाही दाखवू नये; दाखवल्यास मतपत्रिका रद्द होण्याची प्रक्रिया असल्याचे प्रशिक्षणात सांगण्यात आले. मतपत्रिकेचा नंबर गोपनीय ठेवून स्थळ प्रतीवर मतदारांची सही, अनुक्रमांक लिहिणे व त्यात अधोरेखित/टिक करणे आवश्यक असल्याचेही निर्देश देण्यात आले.

मतपेटी गोदरेज कंपनीची असून ती उघडणे, सील बंद करणे यासंदर्भातील प्रशिक्षण होणार असल्याचे सांगण्यात आले. त्या मतपेटीवर ॲड्रेस टॅगवर मतदान केंद्राचे नाव, अनुक्रमांक, पत्ता व दिनांक अचूक लिहिण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मतदान 4 वाजता संपण्याच्या वेळी गेट बंद करणे आवश्यक असून मतदान केंद्रातील उमेदवारांचे मतदान होईपर्यंत मतपेटी बंद करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले. 4 वाजल्यानंतरही रांगेत असलेल्या मतदारांचे मतदान पूर्ण होईपर्यंत मतपेटी बंद न करण्याचे निर्देश देण्यात आले. संपूर्ण मतदान झाल्यानंतर मतपेटी व मतदानाचे साहित्य कापडामध्ये बांधून सील करून नियोजन भवन येथे पोलीस पथकासह परत करणे अपेक्षित असल्याचे प्रशिक्षणात नमूद करण्यात आले.
उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.

Previous Post

मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

Next Post

विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

Related Posts

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई
Blog

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
Blog

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026
आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!
Blog

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

September 23, 2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान
Blog

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!
Blog

आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!

September 21, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
Next Post
विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026