महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील जय हिंद शुगर या कारखान्याला दैनंदिन कामकाजातून बैलांचा वापर पूर्णपणे बंद केल्याबद्दल एका प्रमुख प्राणीहक्क संघटनेकडून “१०० टक्के बैलमुक्त प्रमाणपत्र” प्रदान करण्यात आले आहे.या कारखान्याने उसाने भरलेल्या गाड्या ओढणे यासारख्या कामांमध्ये बैलांचा वापर करणं पूर्णपणे थांबवलं आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अचेगाव येथे स्थित Jai Hind Sugar Pvt Ltd या साखर कारखान्याला हे प्रमाणपत्र (PETA) India यांनी दिले आहे.
PETA च्या प्रसिद्धीपत्रकानुसार, “१०० टक्के बैलमुक्त प्रमाणपत्र” हा असा उपक्रम आहे, जो आपल्या सर्व कामकाजातून बैलांच्या श्रमांचा पूर्णपणे वापर बंद करणाऱ्या साखर कारखान्यांचा गौरव करतो.











