• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गजीनृत्य अन्  ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली शोभायात्रा!

Yes News Marathi by Yes News Marathi
May 30, 2026
in इतर घडामोडी
0
गजीनृत्य अन्  ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली शोभायात्रा!
0
SHARES
3
VIEWS

अहिल्यादेवी, मल्हारी मार्तंड, म्हाळसा आणि बानू यांचे जिवंत देखावे ठरले लक्षवेधी

सोलापूर विद्यापीठातर्फे अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सांगतानिमित्त भव्य आयोजन

सोलापूर- खास धनगरी गजीनृत्य अन् ढोल-ताशांच्या निनादात, कैताळाच्या गजरात आणि पिवळ्या फेट्यांच्या साक्षीने निघालेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची भव्य शोभायात्रा म्हणजे अहिल्यादेवींच्या कार्याला वाहिलेला एक मानाचा मुजरा ठरला. अहिल्यादेवी, मल्हारी मार्तंड, म्हाळसा आणि बानू यांच्या रूपातील अत्यंत प्रभावी जिवंत देखाव्यांनी सोलापूर शहरवाशीयांचे लक्ष वेधून घेतले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती सप्ताह सांगतानिमित्त शनिवारी नॉर्थ कोट मैदान पासून ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य आणि दिव्य शोभायात्रा काढण्यात आली. कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या प्रमुख मार्गदर्शन आणि उपस्थितीत निघालेल्या या शोभायात्रेचा शुभारंभ पोलीस आयुक्त एम. राजकुमार आणि महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आला.  प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा. देवानंद चिलवंत, डॉ. आयेशा रंगरेज, अधिसभा सदस्य रोहिणी तडवळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, वित्त व लेखाधिकारी सीए महादेव खराडे, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे आदींसह शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि एनसीसीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने यात सहभागी झाले.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या ढोल-ताशा आणि कैताळाच्या गजराने शोभायात्रेला सुरुवात झाली. ढोल-ताशा पथकांनी ताल, कौशल्य आणि उर्जा यांच्या संगमातून वातावरण भारून टाकले. अहिल्यादेवींच्या वेशातील कलाकाराने साधी पण तेजस्वी वेशभूषा, कपाळावरील कुंकू, हातातील शिवपिंड आणि चेहऱ्यावरचे सात्विक भाव यामुळे प्रत्यक्ष अहिल्यादेवींचे भासमान रूप साकारले.

मल्हारी मार्तंड, म्हाळसा आणि बानू या देखाव्यांनीही विशेष दाद मिळवली. हातात खड्ग आणि भंडारा घेऊन घोड्यावर स्वार झालेला मल्हारी मार्तंडांचा देखावा पराक्रमाची साक्ष देत होता. म्हाळसा आणि बानू यांच्या पारंपरिक वेशभूषा, अलंकार आणि भावभिनयांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अहिल्यादेवींच्या श्रद्धास्थानांपैकी खंडोबा मंदिराचा त्यांनी केलेला जीर्णोद्धार लक्षात घेता हे देखावे त्यांच्या धार्मिक कार्याची सार्थ कल्पना उपस्थितांपर्यंत पोहोचवत होते.

शोभायात्रेत सहभागी झालेल्या महिलांनी डोक्यावर परिधान केलेले पिवळे फेटे आकर्षणाचा वेगळाच रंग भरत होते. अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या हजारो पिवळ्या फेट्यांमुळे शोभायात्रेला भव्यता आणि एकसंधतेची आगळी ओळख प्राप्त झाली. उपकुलसचिव डॉ. उमराव मेटकरी, सहाय्यक कुलसचिव सोमनाथ सोनकांबळे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात आणि उपाध्यक्ष कांचन आघाव यांच्या समितीने शोभायात्रेचे उत्कृष्ट नियोजन केले. संपूर्ण शोभायत्रेचे सूत्रसंचालन सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले.

Previous Post

आयुक्तांचा रुद्रावतार…! अधिकाऱ्यांवर प्रहार…!

Next Post

सृजन अभियानातील अनागोंदीबाबत तक्रार; महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याकडून गंभीर दखल

Related Posts

‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार
इतर घडामोडी

‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार

July 14, 2026
आषाढी एकादशी : महाद्वार घाट ते पोलीस चौकी परिसरात २४ ते २६ जुलैदरम्यान विक्रेत्यांना साहित्य विक्रीस मनाई
इतर घडामोडी

आषाढी एकादशी : महाद्वार घाट ते पोलीस चौकी परिसरात २४ ते २६ जुलैदरम्यान विक्रेत्यांना साहित्य विक्रीस मनाई

July 14, 2026
गजानन महाराज पालखी मार्गाची महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
इतर घडामोडी

गजानन महाराज पालखी मार्गाची महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

July 14, 2026
आषाढी यात्रा 2026 : वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर समितीची जय्यत तयारी
इतर घडामोडी

आषाढी यात्रा 2026 : वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर समितीची जय्यत तयारी

July 14, 2026
सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं
इतर घडामोडी

सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं

July 13, 2026
धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
Next Post
सृजन अभियानातील अनागोंदीबाबत तक्रार; महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याकडून गंभीर दखल

सृजन अभियानातील अनागोंदीबाबत तक्रार; महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याकडून गंभीर दखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा

July 14, 2026
मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर; मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत वाटप सुरू

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर; मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत वाटप सुरू

July 14, 2026
‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार

‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार

July 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026