खरंच सोलापूर महापालिकेची यंत्रणा बधिर झाली आहे. आम्ही येस न्यूज मराठीच्या माध्यमातून वारंवार यावर प्रहार करत होतो. यावर आयुक्तांनीच शिक्कामोर्तब केला. डेन्मार्क दौऱ्यावरून आल्यानंतर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे महापौर विनायक कोंड्याल आणि पदाधिकाऱ्यांनी विविध कामांची शहरात पाहणी केली. ड्रेनेजची कामे, नाले खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामे, स्वच्छतेची कामे, रस्त्याची अर्धवट कामे हे पाहून आयुक्तांना आपला संताप अनावर झाला. झोन अधिकारी गेंड्याच्या कातडीचे आहेत अशी वाक्ये त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांसमोर अधिकाऱ्यांना सुनावली. बहुतांश अधिकाऱ्यांना कुठल्या ना कुठल्या नगरसेवकांचा किंवा लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद आहे. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असा अभय मिळत असल्यामुळे खाते प्रमुख,अधिकारी लाखो रुपयांची माया कमवतात. परिणामी शहरात फारसी कामे दिसत नाहीत. पावसाळा तोंडावर आला आहे नालेसफाई, रस्त्यातील खड्डे बुजवणे, अर्धवट रस्ते केलेले पूर्ण करणे ,धोकादायक इमारतींची पाडकाम करणे, शहरातील मॅन होल स्वच्छ करणे, आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करणे याबाबत फारशी प्रगती दिसत नाही. त्यामुळेच अधिकारी गेंड्याच्या कातडीचे आहेत असे जाहीर वक्तव्य महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी केले. त्यांनी हातबलता न दाखविता अधिकाऱ्यांचे पोस्टमार्टम करावे आणि त्यांना वटणीवर आणावे तरच यामध्ये परिणामकारक बदल दिसेल नाहीतर पहिले पाढे ५५










