पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू ठेवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिवाजी राठोड या मूळच्या सोलापुरातील कवठे येथे राहणाऱ्या आरोपीलाला आज न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कालावधीत आरोपीने हॉस्पिटलमध्ये वस्तू कशी ठेवली, त्यामागील उद्देश काय होता तसेच या प्रकरणात अन्य कोणी सहभागी आहे का, याचा सखोल तपास केला जाणार आहे.दरम्यान, हॉस्पिटलमध्ये आढळलेली वस्तू बॉम्बसदृश्य असल्याने शहरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी तपास करून परिस्थिती नियंत्रणात आणली होती. आरोपीचा सर्व इतिहास पोलीस तपासत आहे.










