• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Yes News Marathi by Yes News Marathi
May 11, 2026
in Blog
0
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
0
SHARES
2
VIEWS

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन

सोलापूर :- राज्यात पूर्वीपासून गृह खाते हे जनतेच्या जीवाचे रक्षण करते, तर महसूल खाते जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करत असते, या सरकारच्या धोरणानुसार तहसीलदारांनी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत अशी प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

करमाळा येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज करण्यात आले. व घरकुलाच्या बांधकामासाठी वाळूचे प्रतिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते यावेळीआमदार नारायण आबा पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जि. प. सदस्य गणेश चिवटे, रश्मीताई बागल, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन,निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, प्रांत अधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार शिल्पा ठोकडे, सह दुय्यम निबंधक एस. एस. कोकाटे आदी मान्यवर व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

  यावेळी महसूल मंत्री  बावनकुळे म्हणाले,  जनतेने गाऱ्हाणी घेऊन मंत्रालयात जाण्याऐवजी मंत्र्यांनी गावात जाऊन जनतेचे निवेदन तक्रारी स्वीकारणे व सोडवणे हे या सरकारचे धोरण आहे. पुढील चार महिन्यात जिल्ह्यातील एकही गाव यातून सुटणार नाही याची खबरदारी जिल्हाधिकारी यांनी घ्यावी..यापुढे मोजणी प्रक्रियेत गतिमानता येण्यासाठी पंधरा दिवसात मोजणी पूर्ण करणे जिल्ह्यातील पानंद रस्ते व वहीवटीचे रस्ते जिल्हाधिकारी,  तहसीलदार, तलाठी यांनी पालकमंत्र्यांशी समन्वय साधून प्रत्येक रस्ते शोधून त्यांची मोजणी करून शेतकऱ्यांच्या वहिवाटीसाठी सुरू करावेत. तसेच रस्त्याच्या कडेने झाडे लावावी जेणेकरून झाडे तोडली जाणार नाहीत व रस्ता बंद होणार नाही, जर कोणी रस्ता अडवला तर त्या व्यक्ती वर कारवाई करण्यात येईल, त्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण मोजणी होणे आवश्यक आहे.

  जर शेतकऱ्यांसाठी 24 तास लाईट आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले तर शेतकऱ्यां च्या मुलांना नोकरी मागण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे शेतकरी सदन व समृद्ध होईल. पुढील पाच वर्षात सर्व शेतकऱ्यांचे वहिवाटी चे रस्ते बारमाही सुरू होतील, यासाठी हे सरकार प्रयत्नशील आहे. तसेच राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून अनधिकृत रहिवासी घरे कायमस्वरूपी त्यांच्या नावे करून रजिस्ट्रीचा खर्च शासन करेल. तसेच हे सरकार जनतेच्या हितासाठी असून जनतेचे प्रश्न सोडवणे हे सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे. शिवरायांच्या राज्यकारभारात गतिमानता, पारदर्शीपणा आणि लोकाभिमुखता असे शासन होते,  समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीचे कल्याण व्हावे असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत त्यानुसार हे सरकार काम करत आहे. नागरिकांनी दिलेल्या, नियमात असलेल्या निवेदना वर तीन दिवसात मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन  बावनकुळे यांनी यावेळी नागरिकांना दिले. तसेच देवस्थानाच्या जमिनी बाबत कायद्यात सुधारणा करण्याबाबत त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर जनतेची जराही हेळसांड करू नये,  जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवावेत तसेच भ्रष्टाचाराच्या कुठल्याही तक्रारी येता कामा नयेत अशा सूचनाही महसूल मंत्री श्री बावनकुळे यांनी केल्या.
Previous Post

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

Next Post

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

Related Posts

घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
Blog

घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 26, 2026
सोलापुरात इस्माईल कुरेशी यांच्या ‘अजगर अली पंजा’ची सर्वत्र चर्चा; मोहरम मिरवणुकीचे ठरले मुख्य आकर्षण
Blog

सोलापुरात इस्माईल कुरेशी यांच्या ‘अजगर अली पंजा’ची सर्वत्र चर्चा; मोहरम मिरवणुकीचे ठरले मुख्य आकर्षण

June 25, 2026
राज्यातील सर्वात मोठ्या ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रे’चे २७ जून रोजी सोलापुरात भव्य आगमन!
Blog

राज्यातील सर्वात मोठ्या ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रे’चे २७ जून रोजी सोलापुरात भव्य आगमन!

June 25, 2026
तांदुळवाडी दुर्घटना : मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत वितरित
Blog

तांदुळवाडी दुर्घटना : मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत वितरित

June 24, 2026
शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार
Blog

शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

June 23, 2026
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती!
Blog

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती!

June 22, 2026
Next Post
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । 'या' कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग

June 26, 2026
घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्याकडून शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाबाबत आढावा

June 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026