सोलापूर: जुनी मिल कंपाऊंड मुरारार्जी पेठ येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूल ने यंदाच्या वर्षी ही इयत्ता 10 वी च्या 100 %निकाला ची परंपरा कायम राखली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत फेब्रुवारी मार्च 2026या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 10वी चा निकाल जाहीर झाला. सदर निकालात शाळेतील विद्यार्थी ऋतुजा संतोष जमादार (95.40% प्रथम) , अर्पिता चंद्रकांत पवार (94.60% द्वितीय ), जरीन मुक्तियार चौधरी(94% तृतीय) कु. ओमकार संतोष शेट्टी (94% तृतीय) ईश्वरी चंद्रकांत गायकवाड(93.80% चतुर्थ ), समृध्दी अनिल शिंदे( 93.40% पंचम) कु.आर्या विशाल भोसले (93.40% पंचम) श्रेया संतोष होनकळस(93.40% पंचम) गुण मिळवत भरघोस यश मिळवले आहे.
सदर परीक्षेत 108 विद्यार्थी बसले होते . त्या पैकी 37 विद्यार्थ्यांनी विशेष प्रविण्यासह यश संपादन केले, तसेच प्रथम श्रेणीमध्ये 35 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष सूर्यप्रकाश कोठे ,उपाअध्यक्ष देवेंद्र दादा कोठे, सचिव प्रथमेश दादा कोठे, रधिकाताई चिलका ,तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा व सर्व शिक्षक वृंद यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
