• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, April 29, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ साठी 5 जून पर्यंत अर्ज करण्याबाबत पुनश्च आवाहन

by Yes News Marathi
April 29, 2026
in इतर घडामोडी
0
जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ साठी 5 जून पर्यंत अर्ज करण्याबाबत पुनश्च आवाहन
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सोलापूर, दि. 29 (जीमाका) — राष्ट्र व राज्याच्या उभारणीत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून समाजातील विविध क्षेत्रात अनेक युवक व युवा संस्था उल्लेखनीय कार्य करीत आहेत. युवकांमधील सुप्त गुणांना वाव देणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे व त्यांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने राज्य शासनाच्या युवा धोरणांतर्गत शासन निर्णय दि. १२ जानेवारी २०१३ नुसार राज्य व जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतात.


सन २०२५-२६ या वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातील समाजोपयोगी कार्य करणाऱ्या युवक, युवती व नोंदणीकृत संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले होते. मात्र प्राप्त अर्जांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी असल्यामुळे अधिक स्पर्धात्मक व गुणवत्तापूर्ण निवड प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी पुनश्च अर्ज मागविण्यात येत आहेत.


जिल्हास्तरावर १ युवक, १ युवती व १ नोंदणीकृत संस्थेला जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप व्यक्तींसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रुपये १० हजार रोख, तर संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रुपये ५० हजार रोख असे आहे.


सदर पुरस्कारासाठी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, दुर्बल घटकांसाठी योगदान, अनुसूचित जाती-जमाती व आदिवासी विकास, शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, क्रीडा, सांस्कृतिक व विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्र, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता, नागरी वस्ती सुधारणा, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्यांवरील कार्याचा विचार करण्यात येणार आहे. अर्जदारांच्या दि. ०१ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत मागील तीन वर्षांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येईल.


पूर्वी अर्ज न केलेल्या पात्र युवक, युवती व नोंदणीकृत संस्थांनी प्राधान्याने अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.


इच्छुकांनी परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि. ०५ जून २०२६ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत.
तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त पात्र युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.

खरीप सन २०२६-२७ साठी पीक प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरणासाठी

Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयनयांच्या हस्ते ध्वजारोहण होणार

Next Post

खरीप सन २०२६-२७ साठी पीक प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरणासाठीशेतकरी गटांना अर्जाचे आवाहन

Next Post
खरीप सन २०२६-२७ साठी पीक प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरणासाठीशेतकरी गटांना अर्जाचे आवाहन

खरीप सन २०२६-२७ साठी पीक प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरणासाठीशेतकरी गटांना अर्जाचे आवाहन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In