• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

व्हिजन एक्स्पोच्या माध्यमातून महिला उद्योजकांना व्यासपीठ मिळाले – आमदार चित्रा वाघ

Yes News Marathi by Yes News Marathi
April 24, 2026
in इतर घडामोडी
0
व्हिजन एक्स्पोच्या माध्यमातून महिला उद्योजकांना व्यासपीठ मिळाले – आमदार चित्रा वाघ
0
SHARES
0
VIEWS

सहकार भारतीच्या व्हिजन एक्स्पोचे चित्रा वाघ यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

सोलापूर :- महाराष्ट्रातून तसेच देशभरातून महिला उद्योजक तयार व्हावेत यासाठीच सहकार भारतीच्या वतीने चांगले व्यासपीठ देण्याचा प्रयत्न या व्हिजन एक्स्पोच्या माध्यमातून होत आहे याचा आनंद आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पक्ष महिला प्रदेश अध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी केले. सोलापूर जिल्हा सहकार भारतीच्या वतीने 24 ते 26 एप्रिल या तीन दिवसीय व्हिजन एक्स्पोचे नॉर्थ कोट मैदानावर आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन वाघ यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल,माजी आमदार दिलीप माने, शहाजी पवार, सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक शरद जाधव, एक्स्पोच्या स्वागताध्यक्ष सुधा अळ्ळीमोरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सोलापूर संघचालक राजु काटवे आदी मान्यवर उपस्थित होते.

सोलापूरच्या महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी मी या व्हिजन एक्स्पोला आले. सहकार भारतीच्या माध्यमातून सहकारात पारदर्शकता येत आहे. महिलांमध्ये काम करण्याची धमक आणि जिद्द आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 100 योजना सुरू केल्या तर त्यातील 60 योजना या महिलांसाठी आहेत. महिला उभी राहिली तर घर उभं राहतं आणि घर उभं राहिलं तर समाज आणि राष्ट्र उभा राहतो असेही चित्रा वाघ यांनी आपल्या मनोगतामधून सांगितले.

प्रारंभी महिला प्रकोष्ठ प्रमुख प्राची धामणगांवकर यांनी प्रास्ताविक केले त्यामध्ये त्यांनी या व्हिजन एक्स्पोच्या माध्यमातून महिलांना कोणत्या सुविधा देण्यात आल्या आणि आयोजनाबाबतची माहिती दिली. त्यानंतर स्वागताध्यक्ष सुधा अळ्ळीमोरे यांनी सांगितले की हा तीन दिवसाचा इव्हेंट नाही तर महिलांना उद्योजक होण्यासाठी भविष्यात नेहमी मार्गदर्शन आणि सहकार्यृ करण्यात येणार आहे. या व्हिजन एक्स्पोच्या माध्यमातून कला स्वाद आणि संस्कृतीचा अनोखा संगम साधण्यात आला आहे. महिलांनी महिलांसाठी आणि महिलांकडून आयोजित करण्यात आलेला हा सहकार भारतीचा व्हिजन एक्स्पो सोलापूरकरांनी मोठ्यासंख्येने सहभागी होवून महिलांना प्रोत्साहन द्यावे असेही स्वागताध्यक्ष सुधा अळ्ळीमोरे यांनी सांगितले.

महिला उद्योजक होण्यासाठीचा इतिहास आणि सोलापूरच्या विकासातील महिला उद्योजकांची माहिती स्वाती अळ्ळीमोरे यांनी आपल्या मनोगतामधून सांगितले.
हणमंत कोळी यांनी सहकार गीत सादर करून कार्यक्रमाची सुरूवात केली त्यानंतर आमदार चित्रा वाघ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व्हिजन एक्स्पोचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर चित्रा वाघ यांनी महिलांच्या सर्व स्टॉल्सना भेट देवून महिलांकडून उत्पादित केलेल्या वस्तु आणि पदार्थाची पाहणी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड.अर्चना कुलकर्णी यांनी केले तर आभार अ‍ॅड. साधना संगवे यांनी व्यक्त केले. शेवटी शिल्पा जिरांकलगी यांनी वंदेमातरम गीत गायन करून उदघाटन समारंभाची सांगता करण्यात आली. या व्हिजन एक्स्पोच्या उदघाटन समारंभासाठी सहकार भारतीचे विभाग प्रमुख संतोष गायकवाड, कार्यकारणी सदस्य सुर्यकांत पाटील, सोलापूर जिल्हा अध्यक्ष किरण करकमकर, महामंत्री यशवंत बुर्‍हाडे, सुजाता इनामदार,डॉ. जयंत शेळगीकर, प्रशांत बडवे, श्रृती पवार, उत्तरा बरडे, आरती पानगांवकर,कुमुद अंकाराम, सुवर्णा पेठे, चंद्रिका चव्हाण, नगरसेवक सात्विक बडवे आदींसह सहकार भारतीच्या स्वागत समिती सदस्य तसेच मान्यवर मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Previous Post

भोंग्या विरुद्ध सोलापूर ग्रामीण पोलिसाची धडाकेबाज कारवाई, 938 भोंगे काढले

Next Post

TOP 25 । इंद्रभुवन आवारात जागा रिकामी, नागरिकांना नो पार्किंग…आता बारकोड येणार !

Related Posts

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता
इतर घडामोडी

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा
इतर घडामोडी

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती
इतर घडामोडी

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा

June 26, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…
इतर घडामोडी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
इतर घडामोडी

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026
Next Post
TOP 25 । इंद्रभुवन आवारात जागा रिकामी, नागरिकांना नो पार्किंग…आता बारकोड येणार !

TOP 25 । इंद्रभुवन आवारात जागा रिकामी, नागरिकांना नो पार्किंग…आता बारकोड येणार !

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात २८ जून रोजी ‘महाटेट’ परीक्षेचे आयोजन; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न

June 26, 2026
‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026